crimemaharashtrapoliticalsocialsolapur

बहिणीला पोटगी नाकारणाऱ्या भावजीच्या खुनाच्या आरोपातून मेव्हण्यासह दोघे निर्दोष. : ॲड. मिलिंद थोबडे…

 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर

जयराम अंबऋषी लोखंडे वय 50 राहणार साकत, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी बाबासाहेब वसंत काशीद वय 55 व सतीश सदाशिव मोरे वय 57 राहणार साकत तालुका बार्शी यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही एस मलकलपट्टी – रेड्डी यांनी निर्दोष मुक्तता केली.
या हकीकत अशी की, यामधील आरोपी सतीश मोरे याची बहिण सविता ही मयत जयराम याची पत्नी होती. मयत जयराम हा सविता हिस नांदवत नसल्याने सविता हिने बार्शी न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केला होता. जयरामने पोटगी द्यावी म्हणून दोन्ही आरोपी त्याला जीवे मारण्याची धमकी देत होते. आरोपी बाळासाहेब काशीद याने मयतास सदाचे प्रकरण आपसात मिटवू असे म्हणून त्याच्या घरी पिंपरी येथे दिनांक 1. 04. 2017 रोजी मुक्कामी बोलविले होते.

 

 

 

 

मयत जयराम हा पिपरी येथे जाण्याकरिता आरोपी बाळासाहेब काशीद याची वाट बघत थांबला होता. तेथे आरोपी बाळासाहेब याने मयत जयराम यास त्याच्या चार चाकी गाडीतून बार्शी येथे घेऊन गेला. तेथे आदीच हजर असलेला दुसरा आरोपी सतीश मोरे या दोघांनीही जयराम यास ढेकरी येथील शाळेवर नेऊन मारहाण केली. त्यानंतर गौडगाव ते तुळजापूर रस्त्यावर त्याच्या अंगावर क्रुझर जीप घालून त्यास ठार मारले. घटनेची फिर्याद मयताचा भाऊ नानासाहेब लोखंडे याने वैराग पोलीस ठाण्यात दिली होती.

यात सरकार तर्फे एकूण 16 साक्षीदार तपासण्यात आले.

खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात, सुरुवातीस अपघाताची खबर नोंदवून नंतर 25 दिवसाने खुनाची फिर्याद दाखल केली जिच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याचा युक्तिवाद मांडला, तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

 

यात सरकारतर्फे ॲड.आर.एम. कदम व ॲड. ए.एम. गोरे यांनी तर आरोपी तर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड.निखिल पाटील यांनी काम पाहिले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button