crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

केवळ पत्नीच्या इच्छेनुसार पतीचा घटस्फोटाचा खटला तिचे गावचे न्यायालयात वर्ग करता येणार नाही – औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निकाल:-

सोलापूर

 

छत्रपती संभाजी नगर – अहिल्यानगर येथे राहणाऱ्या पत्नीने पुणे येथील न्यायालयात तिच्या पतीने दाखल केलेले घटस्फोटाचे प्रकरण अहिल्यानगर न्यायालयात वर्ग करण्याकरिता दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे.
अहिल्यानगर येथून पुणे न्यायालयात जाणे-येणे दुबळ्या आर्थिक परिस्थितीमुळे व इतर कारणास्तव शक्य नसल्यामुळे पतीने पुणे न्यायालयात दाखल केलेले घटस्फोटाचे प्रकरण अहिल्यानगर येथील न्यायालयात वर्ग करण्याकरिता पत्नीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावेळी युक्तिवादात पत्नीच्या वकिलांनी पत्नीच्या दुबळ्या आर्थिक परिस्थिती बरोबरच त्यांच्यातील अन्य प्रकरणे देखील अहिल्यानगर न्यायालयातच प्रलंबित असल्यामुळे पुणे न्यायालयातील घटस्फोटाचे प्रकरणही अहिल्यानगर न्यायालयात वर्ग करण्याची न्यायालयास विनंती केली.

 

 

 

त्यावेळी त्यास पतीचे वकील सोलापूर येथील अ‍ॅड. अथर्व अंदोरे यांनी सक्त विरोध करीत पतीने त्याच्या सोयीनुसार पुणे न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण कायदेशीरपणे दाखल केले असून केवळ पत्नीच्या इच्छेनुसार घटस्फोटाचा खटला तिचे माहेरच्या गावचे न्यायालयात वर्ग करणे न्याय्य नसून पतीची सोय देखील तितकीच महत्वाची आहे. त्याचप्रमाणे पतीला त्रास देऊन त्याचे आर्थिक नुकसान होण्यासाठी पत्नीने ही याचिका दाखल केलेली आहे, असा युक्तिवाद केला.

 

 

 

अ‍ॅड.अथर्व अंदोरे याचा युक्तिवाद मान्य करीत न्यायमूर्तिनी पत्नीची याचिका फेटाळली.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकेतील पतितर्फे अ‍ॅड.अथर्व अंदोरे (सोलापूर), अ‍ॅड.मनिषा दळवे (वैराग) यांनी काम पाहिले. तर पत्नीतर्फे अ‍ॅड.सुवर्णा झावरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button