सोलापूर
दिनांक 28.07.2024 रोजी 23.00 वा.ते दिनांक 29.07.2024 रोजी सकाळी 10.00 वा. सुमारास फिर्यादी रविंद्र मधुकर शिंदे (वय 36 रा.पाकणी ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर ) यांचे मौजे पाकणी ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर हॉटेल स्वराज्य परमीट रूम व बारच्या किंचनच्या खिडकीचे लोखंडी गज अज्ञात चोरटयाने परमीट बार मधील 2 बॉक्स रॉयल स्टॅक कंपनीचे व्हिस्की, 1 बॉक्स इॅम्पेरिअल ब्यु कंपनीची व्हिस्की, 1 बॉक्स फाटलेला मॅकडाल नंबर वन कंपनीची व्हिस्की व 16 ब्लेडर स्पाईड कंपनीची व्हिस्की असा एकूण 36,800/-रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला म्हणुन वगैरे मजकुराच्या दिलेल्या फिर्यादी वरून सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटकरणातील पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर यांचेकडे देण्यात आला होता.
सदर गुन्हयाची उकल होण्याच्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अंमलदार हे मा.श्री.शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली करीत असताना, पोनि/राहुल देशपांडे यांना त्यांचे गोपनिय बातमीदार यांचेकरवी सदरचा गुन्हा मौजे रानमसले ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर येथील आरोपी यांनी त्यांचे साथीदारसह केला असल्याची बातमी मिळाली होती.
त्याप्रमाणे पोनि/राहुल देशपांडे यांनी सदरची बातमी गुन्हे प्रकटीकरणातील अंमलदार यांना सांगुन त्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे डी.बी.मधील अंमलदार यांनी दोन्ही संशयित आरोपीचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्या दोघांना गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन त्याचे अधिक विचारपूस करून तपास केला सुरूवातीस त्या दोघांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर त्या दोघास अधिक विश्वातसात घेऊन विचारपूस करून तपास केला असता त्या दोघांनी गुन्हयाची कबुली दिली होती.
त्यानंतर ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपी यांना दिनांक 04.08.2024 अटक करून मा.न्यायालया समक्ष दिनांक 05.08.2024 रोजी हजर केले असता मा.न्यायालयांनी 2 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली होती. सदर पोलीस कस्टडी दरम्यान त्या दोघांचे विचारपूस करता त्यांनी वर नमूद गुन्हयातील गेला माल पैकी 15,010/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या व्यतिरिक्त दोघांकडुन खालील नमूद गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे
आरोपी
1) रामचंद्र उर्फ पिंट्टया हरीषचंद्र काळे (वय 32)
2) किसन गंगाराम पवार (वय 48 ) दोघे रा.रानमसले ता.उत्तर सोलापूर
2) सोलापूर तालुका, पोलीस ठाणे 171/2024 या गुन्हयातील चोरीस गेली गॅस व ते नेणे करीता वापरण्यात आलेली
दुचाकी मोटारसायकल असा एकूण 52,500/-रूपये किंमतीचा मुद्देमाल
3) मोहोळ पोलीस ठाणे गुरनं 482/2024 या गुन्हयातील 7715/- रूपये किंमतीचा मुद्देमाल
4) मोहोळ पोलीस ठाणे गुरनं 411/2024 या गुन्हयातील 48,000/-रूपये किंमतीचे एलोरा कंपनीचे कांदा बीयाचे एकूण
40 पॉकीट
5) मोहोळ पोलीस ठाणे गुरनं 471/2024 या गुन्हयातील 12,470/-रूपये किंमतीच्या विविध कंपनीच्या तेलाच्या बाटल्या
6) वैराग पोलीस ठाणे गुरनं 162/2024 या गुन्हयातील 10,300/-रूपये किंमतीचे TRIGUR कंपनीची 40 इंची टी.व्ही 1
ड्रील मशीन, पाण्याचा तसेच घरफोडी चोरी करणे करीता वापरलेली हत्यार हस्तगत केले आहे.
सदर दोन्ही संशयित आरोपी हे सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस सोयाबीन चोरीच्या गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपी आहेत. सदर आरोपी यांचेकडुन आणखी गुन्हे उकल होण्याची शक्यता असल्याचे मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई मा.श्री.शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.राहुल देशपांडे,पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणातील सहायक पोलीस निरीक्षक/सत्यजित आवटे, पोहवा/राहुल महिंद्रकर, पोना/लालसिंग राठोड, अनंत चमके, नागेश कोणदे, अभिजित सांळुखे, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ, फिरोज बारगीर व वैभव सुर्यवंशी यांनी पार पाडली आहे.