बापा विरुद्ध मुलाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार …
आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल मनोहर सपाटेसह तिघांविरुध्द चिंतामणी सपाटे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
सोलापूर –
असाध्य रोगानेग्रस्त विधवा नातेवाईक महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा जाब विचारल्यावरून व गे सोबत शरीरसंबंध ठेवताना मनोहर सपाटे यांना रंगेहाथ पकडल्याच्या कारणावरून व काही वर्षापूर्वी शिवपार्वती लॉजवर उत्तर प्रदेश व बिहारमधील अज्ञात लोकांना योगेश पवार यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती असल्याच्या कारणावरून मनोहर हे मुलगा चिंतामणी सपाटे यांचेवर चिडून होते. त्यामुळे लग्नाचे निमित्त करून मनोहर सपाटे, ज्ञानेश्वर सपाटे, पुजा नलवडे व राजेंद्र नलवडे याव्यक्तींनी खोट्या केसेसची धमकी देवून साखरपुडा करण्यासाठी जबरदस्ती करून माझा मानसिक-शारीरिक छळ करून चिंतामणी सपाटे यांस दि. 01/09/2022 रोजी विष पीवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. व हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असताना मोबाइलमधील कॉल व मेसेजचे पुरावे नष्ट केले व आता पुन्हा एकदा मुलगा चिंतामणी याने आत्महत्या करावी, म्हणून मोडलेल्या साखरपुड्यातील फोटोंचा गैरवापर करून जाणीवपूर्वक मानसिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त करीत आहेत. व आत्महत्या न केल्यास चिंतामणीची हत्या करून त्यास आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न मनोहर सपाटे, ज्ञानेश्वर सपाटे, पुजा नलवडे व राजेंद्र नलवडे हे करीत असल्याची लेखी तक्रार चिंतामणी सपाटे यांनी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचेकडे केली आहे. त्याची तातडीने दखल घेवून पोलीस आयुक्तांनी सदरची तक्रार गुन्हे शाखेकडे चौकशी कामी वर्ग केल्याची माहिती चिंतामणी सपाटे व योगेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की…, मनोहर सपाटे यांच्या एकूण गैरवर्तणूकीवरून व कौटुंबिक कारणास्तव मुलगा चिंतामणीसोबत मतभेद झाले. त्यामुळे चिंतामणी सन 2015 मध्ये घर सोडून पुण्यात गेला. सन 2017 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की नको, म्हणून काही ज्येष्ठ मंडळींनी समजूत काढली. व कोणताही मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास देणार नाही व लग्न करण्यासाठी जबरदस्ती करणार नाही व यापुढे महिलांबबात गैरकृत्य करणार नसल्याचे सांगून चिंतामणी यांस सोलापुरात घेवून आले.
परंतु, घरी आल्यावर नातेवाईक महिलेवर केलेल्या अत्याचाराबाबत जाब विचारल्याची खुन्नस व राग मनात धरून मनोहर सपाटे व ज्ञानेश्वर सपाटे हे दोघेही चिंतामणी यांस मानसिक व शारीरिक त्रास देवून लग्न करण्यासाठी जबरदस्ती करीत. तेव्हा लग्नच करणार नाही, असे मनोहर सपाटे व ज्ञानेश्वर सपाटे यांना सांगितल्यावर त्या दोघांनी शरद बँकेतील महिलाकडून विनयभंगाची केस करण्याची धमकी दिली. व केस करण्यासाठी बँकेतील एका महिलेस बोलावले. त्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलो. त्याचा गैरफायदा घेवून मनोहर व ज्ञानेश्वर सपाटे यांनी परस्पर पसंत करून ठेवलेली व चुलतीच्या नात्यातील पानगांव, बार्शी येथील पुजा नलवडे या मुलीसोबत लग्न करण्याची चिंतामणी यांचेवर जबरदस्ती केली. व तू जर या मुलीशी लग्न केले नाही, तर तुला प्रॉपर्टीमधून बेदखल करीन असा दम दिला व त्यामुळे मुलगी पसंद नसतानाही नाईलाजस्तव त्या मुलीस होकार दिला. त्यानंतर मनोहर सपाटे यांनी जबरदस्तीने मुलीच्या घरी बार्शी येथे पुजा नलवडे हिचा सोबत चिंतामणीचा साखरपुडा केला. व त्या साखरपुड्याचे फोटो काढले. साखरपुड्यावेळी मुलीला जवळून बघितल्यावर, मुलीने तीन छोटे विग वापरल्याचे व मनोहर सपाटे यांचेशी संगनमत करून बायोडाटामध्ये खोटी माहिती दिल्याचे समजले. त्यानंतर चिंतामणीने घरी आल्यावर यासर्व गोष्टी मनोहर सपाटे व ज्ञानेश्वर सपाटेना सांगितल्या, मुलगी पसंत नसतानाही तुम्ही जबरदस्तीने साखरपुडा का केला, असे विचारले. तेव्हा मनोहर व ज्ञानेश्वर सपाटे यांनी मला सांगितले की, तू त्या मुलीचा गुपचुप स्वीकार कर. नाहीतर तुझ्या साखरपुड्याचे फोटो दाखवून त्या मुलीकडून व तिच्या कुटुंबियांकडून तुझ्यावर खोट्या केसेस करून तुला जेलमध्ये टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर मनोहर व ज्ञानेश्वर सपाटे आणि पुजा नलावडे व तिच्या वडिलांनी इच्छेविरुध्द लग्न करण्यासाठी दबाव टाकला व खोट्या केसेस करून आयुष्यभर जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. तसेच ज्ञानेश्वर सपाटे व माझे कार्यकर्त्याकडून तुला बदडून काढून कायमचा संपवून टाकीन व खल्लास करीन, अशी धमकी मनोहर सपाटे यांनी दिली. दिनांक 01/09/2022 रोजी मनोहर सपाटे यांनी पूर्वीचा राग मनात धरून व लग्न न करण्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी दिली व तुझ्यासारख्या नामर्द लोकांनी लग्न करावे, नाहीतर जीव द्यावा, असे बोलून अंगावर धावून आल्यामुळे मानसिक धक्का बसला. मनोहर व ज्ञानेश्वर सपाटे, पुजा व राजेंद्र नलवडे हे सर्वजण सतत खोट्या केसेस करण्याच्या धमक्या देवून व घालून-पाडून बोलून आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचे जाणविले व त्यामुळे या सर्वांच्या त्रासाला कंटाळून मनोहर सपाटे व राजेंद्र नलवडे यांचे मोबाइलवर ‘माझ्या आत्महत्येला संपूर्णपणे तुम्ही जबाबदार आहेत’ असा मेसेज पाठविला. व रूम नंबर 106 शिवपार्वती लॉज येथे दि. 01/09/2022 रोजी मनोहर सपाटे यांचे समोरच विष पिले व मी जागेवरच बेशुध्द झालो. त्यानंतर लॉजमधील स्टाफ व घरातील लोकांनी अश्विनी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले, तेव्हा मी खूपच सीरियस होतो. विष पीवून अॅडमिट झाल्यावर गुन्हा दाखल होवू नये व मोबाइलमधून मनोहर सपाटे व राजेंद्र नलवडे यांना पाठविलेले मेसेज पुरावे म्हणून पोलिसांना सापडू नये, म्हणून मनोहर व ज्ञानेश्वर सपाटे या दोघांनी मोबाइल मधील सर्व मेसेज, कॉल हिस्ट्री व माहिती डिलीट केली. व मनोहर सपाटे यांनी हॉस्पिटल व पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव आणून MLC होवू दिली नाही. असे तक्रारीत नमूद केले. या पत्रकार परिषदेस चिंतामणी सपाटे व छावाचे योगेश पवार वायपी हे उपस्थित होते.