crimemaharashtrapoliticalsocialsolapur

क्राईमझोन:- मटका किंग प्रसाद लोंढे याच्यासह इतर साथीदारांनी मिळून केला अथर्व जाधव चा खून ….

तडीपार असताना प्रसाद लोंढे सोलापुरात कसा ? ....

सोलापूर

सराईत गुन्हेगार , कुख्यात गुंड ,
मटकाकिंग प्रसाद लोंढे ने विजापूर रोड भागात आपली दहशत बसविली आहे . मारहाण , खंडणी , दरोडा , धमकी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे प्रसाद लोंढे वर दाखल आहेत. या कारणाम्यांमुळेच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रसाद लोंढेच्या तडीपारी चा आदेश काढला. मात्र या प्रसाद ची. हिंमत तर बघा तडीपारी चा आदेश डावलून तो सोलापूरात बिनधास्त फिरतोय आणि पुन्हा दहशत माजवतोय . अजुनही प्रसाद लोंढे ची गुंडगिरी सुरूच आहे . प्रसाद लोंढे विजापूर रोड भागात मटका चालवतो. त्याच्याकडे अथर्व जाधव हा मटका एजेंट होता. होता याचा अर्थ सरळ या मटक्याच्या आर्थिक व्यवहारातून प्रसाद लोंढे व त्याचे इतर साथीदार बाळू काळे ,सागर कदम ,केदार गुमटे,मनोज सूर्यराव उर्फ भाईजी अजिंक्य शाबादे,प्रकाश शिंदे उर्फ बुध्दा , जॉकी थोरात , विनायक जाधव ,यांनी व त्यांच्या साथीदार हे त्यांच्या खासगी वेगवेगळ्या तीन चारचाकी वाहनांनी इंडीयन मॉडेल इंटर नॅशनल शाळेच्या पाठीमागे रेणुका नगर येथील मोकळ्या मैदानात अथर्व चा शोध काढत दाखल झाले . आणि त्या सर्वांनी मिळून त्यांच्याकडील असलेल्या काठ्या , लोखंडी रॉड व कोयत्याने अथर्व ला जबर मारहाण केली . यात अथर्व गंभीर जखमी झाला . या घटनेनंतर अथर्वच्या घरी 8600773567 या अनोळखी नंबर वरून फोन गेला तुमच्या अथर्वचा अपघात झाला आहे त्याला खूप लागले आहे उपचारासाठी त्याला केअर हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले आहे . तुम्ही तात्काळ जा . या फोन नंतर जाधव कुटुंबिय धावपळ करत तात्काळ केअर हॉस्पिटल येथे दाखल बघतात तर अथर्व स्ट्रेचवर. अथर्व ला या अवस्थेत पाहताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला . अथर्वसह त्याचे इतर मित्र प्रदीप मंगळवेढेकर ,शिवकुमार तंबाखे ,राहुल साठे ,समर्थ माटे, यांना कुख्यात गुंड प्रसाद लोंढे ,गुन्हेगारी च्या हिट लिस्ट वर असलेले त्याचे इतर साथीदार बाळू काळे ,सागर कदम ,केदार गुमटे,मनोज सूर्यराव उर्फ भाईजी अजिंक्य शाबादे,प्रकाश शिंदे उर्फ बुध्दा , जॉकी थोरात , विनायक जाधव ,यांनी मिळून जबर मारहाण केली .यात अथर्व ची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला ICU मध्ये ठेवले मात्र विषय अधिकच गंभीर झाल्याने त्याला अश्विनी हॉस्पिटल येथे घेऊन जा असे डॉक्टरांनी अथर्व च्या नातेवाइकांना सांगितले .तात्काळ नातेवाईकांनी अथर्व ला रुग्णवाहिकेतून अश्विनी हॉस्पिटल ला उपचारासाठी हलविले.अश्विनी मध्ये घेऊन गेल्यानंतर अथर्व ला पुन्हा ICU मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्याच्यावर उपचार सुरू असताना दिनांक 5/10/2024 रोजी रात्री १:३० वा च्या सुमारास अथर्व मयत झाल्याचे डॉक्टरांनी अथर्व च्यां नातेवाइकांना सांगितले. कोविड -१९ महामारी च्या काळात जाधव कुटुंबीयांचा थोरला मुलगा आजाराने त्रस्त होता त्याचा याच काळात मृत्यू झाला होता. यातील फिर्यादी दिनेश प्रकाश जाधव यांना दोन मुलेच होती .त्यापैकी ओंकार हा थोरला होता त्याचाच मृत्यू झाला होता .
त्यानंतर आता अथर्व चा मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर जणू कोसळला होता . उतार वयात जाधव कुटुंबियांची पोटची दोन्ही मुले काळाच्या पडद्याआड गेल्याने विजापूर रोड भागातील स्थानिक नागरिकांनी शोक व्यक्त केला . सूत्रांच्या मिळालेल्या माहितीवरून मूळ घटनेचे कारण हे मटक्याच्या वादातूनच झाले असले तरी पोलिसांनी फिर्याद आर्थिक देवाण – घेवाण वरून खून झाल्याचे कारण समोर केलय. दरम्यान याबाबत अथर्वचे वडील दिनेश प्रकाश जाधव यांनी विजापूर ना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या घटनेतील आरोपी कुख्यात गुंड प्रसाद लोंढे ,गुन्हेगारी च्या हिट लिस्ट वर असलेले त्याचे इतर साथीदार बाळू काळे ,सागर कदम ,केदार गुमटे,मनोज सूर्यराव उर्फ भाईजी अजिंक्य शाबादे,प्रकाश शिंदे उर्फ बुध्दा , जॉकी थोरात , विनायक जाधव यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२४,३५१,३५२ सह शस्त्र अधिनियम १९५९नुसार कलम 4/25,महाराष्ट्र पोलीस अधिनियम १५१ नुसार १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला .
शहरात अवैध धंद्यांना चांगलेच उधाण आले असून पोलीस प्रशासनास वारंवार या धंद्याबाबत निवेदन दिले जात असूनही केवळ पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने पोलिसांच्या कार्य पद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातायत. यातूनच हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले असले तरी पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालून वेगळेच प्रकरणावर पडदा टाकत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अवैध धंदे चालकां समवेत पोलिसांचे लागेबंध तर नाहीत ना असा प्रश्न सोलापूरकरां मधून उपस्थित केला जातोय .
जाधव कुटुंबीयांना या प्रकरणात पोलीस आयुक्त न्याय मिळावा मिळवून देणार का ? तडीपार सराईत गुन्हेगार प्रसाद लोंढे सह इतर हिट लिस्ट वर असलेल्या त्याच्या इतर गुन्हेगार साथी कडक शासन होणार का ? केवळ सर्व सामान्यांना वेठीस न धरता गुन्हेगारांचा तात्काळ बंदोबस्त केला जावा शहरात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न करावेत अवैध धंद्यांना सोलापुरातून हद्दपार करावं अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे या प्रकरणात येणाऱ्या काळातील प्रत्येक घडामोडींवर KCitynews ची विशेष नजर असेलच प्रत्येक घटनांचा पर्दाफाश रोख – ठोक मांडणीतून होणारच आपल्या तक्रारी आमच्या पर्यंत पोहोचिण्यासाठी आजच आमच्या ८८५५९०७७१६ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आम्ही करत आहोत….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button