crimemaharashtrasocialsolapur

अथर्व जाधव खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रसाद लोंढे ला विजापूर नाका पोलिसांनी केली अटक…

KCitynews चा Empact...

सोलापूर

तडीपार असतानाही शहरात येऊन दहशत माजवून मोकटपणे फिरून आपल्या साथीदारांसह १९ अथर्व जाधव याची हत्या करणाऱ्या आरोपी प्रसाद लोंढे ला विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतलय. याबाबत K City news ने आवाज उठून प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.घडलेली हकीकत रोख – ठोक पणे मांडून मुख्य आरोपी प्रसाद लोंढे ला व त्याच्या इतर सह आरोपी साथीदारांना अटक करावी आणि जाधव कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा यासाठी K city news ने विशेष परिश्रम घेतले होते. K city news चे मुख्य संपादक वैभव गंगणे यांनी घटने पाठीमागचे नेमके पार्श्वभूमी आपल्या लेखणीतून समोर आणली होती. अखेर पोलिसांना या घटनेचे दखल घ्यावी लागली. आणि कुख्यात गुंड प्रसाद लोंढेला विजापूर नाका पोलिसांनी माढ्यातून अटक केली. आरोपी प्रसाद लोंढेच्या शोधार्थ पोलिसांची विविध पथके रवाना झाली होती . आरोपी प्रसाद लोंढे माढ्यात लपून बसल्याच खबरी मार्फत पोलिसांना बातमी मिळाली. त्या अनुषंगाने सापळा लावून प्रसाद लोंढेला पोलिसांनी ताब्यात घेतल. प्रसाद लोंढे ला लवकरच सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेबाबतच्या सर्व घडामोडी सविस्तरपणे K City News च्या. माध्यमातून प्रखरपणे मांडल्या जातील. मयत अथर्व जाधव याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देईपर्यंत शांत बसणार नसल्याच Kcity news चे मुख्य संपादक वैभव गंगणे यांनी सांगितल. प्रसाद लोंढे ला सद्यस्थितीत अटक करण्यात आली असली तरी अन्य आरोपी हे फरारच आहेत लवकरच ते आरोपींना ताब्यात घेऊ आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल आहे.. समाजात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी Kcitynews नेहमीच अग्रेसर असणार आहे आपल्या तक्रारी आमच्या पर्यंत पोहोवण्यासाठी आजच ८८५५९०७७ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन मुख्य संपादक वैभव गंगणे यांनी केलं आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button