क्राईम रिपोर्टर संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण रोटे सचिवपदी रमेश पवार…

सोलापूर,
दि. ६ – क्राईम रिपोर्टर संघटनेच्या अध्यक्षपदी दै.जनसत्यचे अरुण रोटे यांची तर सचिवपदी दै दिव्य मराठीचे रमेश पवार यांची निवड करण्यात आली.
क्राईम रिपोर्टर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दै. सुराज्यचे अखलाक शेख व दैनिक लोकमतचे विलास जळकोटकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. त्यामध्ये एक वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी असे :
अध्यक्ष – अरुण रोटे (दै. जनसत्य), – उपाध्यक्ष – तात्या लांडगे (दै. सकाळ), संताजी शिंदे (दै.लोकमत), सरचिटणीस रमेश पवार (दै. दिव्य मराठी), खजिनदार – परशुराम कोकणे (स्मार्ट सोलापूरकर), सहचिटणीस – – रजनीकांत उपलंची (जनदर्पण चॅनेल).
कार्यकारिणी सदस्य – इरफान शेख, रुपेश हेळवे, मुज्जमिल शहानुरकर, मुन्ना शेख,मुकुंद उकरंडे, रोहन नंदाने, रत्नदीप सोनवणे, भरत मोरे.
सल्लागार- अखलाक शेख, अनिल कदम, संजय जाधव, सरदार आत्तार, विलास जळकोटकर, अमोल व्यवहारे,धनंजय मोरे, विनायक होटकर. विजयकुमार राजापुरे.