BAMS भरती प्रक्रियेतील गैरप्रकार आणि योग्य न्याय मिळावा …

सोलापूर
BAMS गट – अ निकालाच्या संदर्भात भरती प्रक्रियेत काही गंभीर गैरप्रकार घडल्याचे आढळून आले आहे. PG/MD/MS पदवीधारक उमेदवारांना अपेक्षित प्राधान्य न देऊन भरती प्रक्रिया मनमानी पद्धतीने राबवली जात आहे. यामुळे अनेक पात्र उमेदवारांना अन्याय सहन करावा लागत आहे.
विशेषत: भरती प्रक्रियेत सत्रांनुसार गुणांचे विभाजन करण्यात आले असून सकाळच्या सत्रातील परीक्षार्थींना अधिक प्राधान्य दिले गेले आहे. दुपारच्या सत्रातील परीक्षार्थींच्या गुणवत्तेची योग्य दखल घेतली गेली नाही, ज्यामुळे भरती प्रक्रियेत असंतोष आणि पारदर्शकतेचा अभाव निर्माण झाला आहे.
त्याअनुषंगाने आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
PG/MD/MS उमेदवारांना योग्य प्राधान्य: उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत न्याय दिला जावा आणि त्यांच्या गुणवत्तेला सन्मान मिळावा.
Normalization विषयी स्पष्टता: जर normalization प्रक्रिया केली गेली असेल, तर त्यासंबंधी स्पष्ट माहिती जाहीर करावी, तसेच raw score आणि normalized score सुद्धा सार्वजनिक करावा.
सर्वांसाठी एकच सत्रात परीक्षा: भरती प्रक्रियेत सर्वांना समान संधी मिळावी यासाठी परीक्षा एकाच सत्रात offline पद्धतीने घेतली जावी.
मुलाखतींचा समावेश: गुणवत्तेची खरी कसोटी लावण्यासाठी मुलाखतींचा समावेश करून अधिक पारदर्शक प्रक्रिया राबवावी.
तसेच, MPSC प्रमाणे एकत्रित परीक्षेची योजना आखून सर्व परीक्षार्थींना समान वागणूक मिळावी याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षार्थी कडून केली जात आहे…