solapur

आदीला नदी संदर्भात आढावा बैठक ! आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत ७४ नाल्यांचे सादरीकरण.१९ नाल्याचे काम सुरु…

 

सोलापूर

 

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आज आदीला नदी व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षते खाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगररचना संचालक मनीष भीष्णूरकर, नगर अभियंता सारिका अकोलवार,नगरसेवक भरतसिंग बडूरवाले अजय पोनम तसेच प्रकाश दिवानजी, नीलकंठ मठपती, शकील शेख कनिष्ठ अभियंता मनोज जाधव व एन्व्हायरोसेफ कन्सल्टंट, सोलापूर चे प्रतिनिधी रेसिडेंट इंजिनियर चंद्रकांत गुंडे, नरेश पोबत्ती , अभिषेक टोणपे, अमीर शेख, शारदा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, लातूरचे प्रोजेक्ट मॅनेजर सचिन लकारे , साईट इंजिनियर राहुल यातकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

बैठकीत आदीला नदीसंदर्भात ब्ल्यू लाईन व रेड लाईन निश्चिती, योग्य मार्किंग, हिप्परगा तलावातील पाण्याची स्थिती, पूर आल्यानंतरची परिस्थिती तसेच नदी व नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.आदीला नदी परिसरातील काही नागरिकांनी प्रलंबित बांधकाम परवानग्या तसेच पूर्ण झालेल्या बांधकामांचे वापर परवाने देण्याबाबत मागणी केली. तसेच महापालिकेकडून अंतिम लेआउट मिळालेल्या नागरिकांनीही आपल्या अडचणी मांडल्या. संबंधित मागण्यांवर नियमांनुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.यानंतर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शहरातील ७४ नाल्यांच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले.

 

 

 

त्यामध्ये १९ नाल्याचे काम सुरु असून त्यामध्ये पुढील नाल्यांचा समावेश आहे मुरारजी पेठ (उमानगरी) नाला, एमआयडीसी – वज्रेश्वरी नगर नाला (भाग १ व २), अक्कलकोट रोड ते पोगुल विहीर नाला, पोगुल विहीर ते हैदराबाद रोड नाला, हैदराबाद रोड ते आदर्श नगर नाला, आदर्श नगर ते शेळगी नाला, रिंग रोड ते रघोजी ट्रान्सपोर्ट ते शेळगी नाला, आरती नगर – जमादार वस्ती – नक्का वस्ती नाला, विश्रांती चौक ते अंतर्गत रिंगरोड ते राष्ट्रीय महामार्ग (रुपाभवानी मागे) नाला, कलावती नगर – आशा नगर – वीटकर कारखाना – नेताजी शाळा – नवले नगर – कलप्पाण्णा नगर नाला, जय भवानी शाळा ते विश्रांती चौक नाला, निलम नगर – शांती नगर नाला, सुमय्या नगर – स्वागत नगर – देसाई नगर नाला (भाग १ व २), विजय नगर – दीक्षित नगर – शोभा नगर नाला, होटगी रोड (युगंधर हॉस्पिटल डाव्या बाजूचा) नाला, मुलतानी बेकरी – होटगी रोड क्रॉसिंग ते दक्षिण मध्य रेल्वे कल्व्हर्ट पर्यंतचा नाला, वळसंगकर हॉस्पिटल मागील बाजू – रामवाडी एरिया नाला, आदी प्रमुख नाल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती निधीतून या कामांसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
यावेळी महापौरांनी निर्देश दिले की, नाल्यांची कामे करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. कामे दर्जेदार, नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करून शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button