crimemaharashtrapoliticalsocialsolapur

शहरात घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या शहर गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या एकूणच ३ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…

सोलापूर

 

सोलापूर शहरामधील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर, यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले होते.

 

 

 

दि. ३१/१२/२०२५ रोजी सदर बझार पोलीस ठाणे येथे दिवसा घरफोडी संदर्भात गु.र.नं. १०६०/२०२५ भा.न्या.सं. कलम 305, 331(3), प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. हा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सो यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व पोलिस उप निरीक्षक मुकेश गायकवाड यांचे तपास पथकास मार्गदर्शन करुन, त्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे वरील पथक सोलापूर शहरामध्ये गुन्हेगारांचा शोध घेत असताना या गुन्हयातील संशयित आरोपीबाबत गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यास सापळा रचून शिताफिने ताब्यात घेतले.

 

 

चौकशीमध्ये त्याचे नाव किसन महादेव व्हनकोरे वय 29 वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार- दादावस्ती, लोहगाव, पुणे, मुळ राहणार- मु. पो. वाघदरी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर असे असल्याचे समजले. त्याच्याकडे सदर गुन्हयाच्या अनुषंगाने कौशल्यपुर्ण तसेच तांत्रीक तपास केला असता त्याने सोलापूर शहरामध्ये एकुण ५ ठिकाणी घरफोडी केले असल्याबाबत निष्पन्न झाले.

 

 

 

यामध्ये सदर बझार पोलीस ठाणे, एम आय.डी. सी पोलिस ठाण्याकडील असे दोन्ही मिळून ५ गुन्हे उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेच्या पथकास आले आहे.

या गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी ५१ ग्रॅम (५.१ तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने व ८२० ग्रॅम (८२ तोळे) वजनाचे चांदीचे दागिने असा एकुण ३,७२,८००/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. घरफोडी गुन्ह्याचा कौशल्याने व सातत्यपूर्ण तपास करुन हे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

 

 

 

 

ही कामगीरी मा.पोलीस आयुक्त एम राजकुमार,मा. पोलीस उप-आयुक्त साो. (गुन्हे/विशा) अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त साो. (गुन्हे) राजन माने , वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने , गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि पोलिस उप निरीक्षक मुकेश गायकवाड व पथकातील अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, अनिल जाधव, महेश शिंदे, कुमार शेळके, संजय साळुंखे, महेश पाटील, राजु मुदगल, अजिंक्य माने, महेश रोकडे, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, भारत पाटील, चालक महेंद्र ठोकळ, शाम सुरवसे, बाळु काळे, सतिश काटे, सायबर शाखेकडील कडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button