crimemaharashtrapoliticalsocialsolapur

वाळु तस्कर सुरज शिंदे यास MPDA कायदयान्वये येरवाडा कारागृहात स्थानबध्द….

अतुल वी. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी अवैधरित्या वाळुतस्करी करणाऱ्या इसमा विरूध्द कार्यवाह करून गुन्हे दाखल करावे तसेच प्रभावी प्रतिधक कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील सुरज हरीभाऊ शिंदे, रा. अनवली, ता. पंढरपुर याचे विरूध्द वाळुचोरीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना व सार्वजनिक सुव्यवस्थेस बधा आणणाऱ्या कृत्यापासुन रोखण्यासाठी  अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

कुमार आशिर्वाद, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांनी MPDA कायदयान्वये स्थानबध्द करण्याबाबत आदेश निर्गमित केले आहे.

स्थानबध्द इसम सुरज शिंदे यांचे विरूध्द अवैधरित्या वाळू उपसा करणे, वाळु चोरी करणे, चोरलेली वाळुची वाहतुक करून ती विक्री करीता पाठवणे व इतर, स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापुर्वी त्यास श्री. अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांनी हद्दपार केले होते. तरी देखील सुरज शिंदे याने पुन्हा पुन्हा गुन्हेगारी कारवाई करुन सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत व भिती निर्माण होती. कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधीत झाली होती.

पोलीस निरीक्षक, टिःवाय, मुजावर ने. पंढरपुर तालुका पोलीस ठाणे यांनी त्यास ताब्यात घेवून येरवडा कारागृह, पुणे येथे स्थानबध्द केले आहे. वाळूतस्करी करणारे व शरिराविधक व मालाविषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे तसेच अवैधदारू विक्री करणाऱ्या इसमांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले आहे. त्यांच्यावर अशाच स्वरूपाची प्रभावी कारवाई यापुढे देखील करण्यात येईल.

 

 

 

 

ही कार्यवाही अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक,  प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शना खाली .

प्रशांत डगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप, ने. स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, टि. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेळेकर, पोलिस उपनिरीक्षक भोसले, वडणे, सहाय्यक पोलिस फौजदार गयकवाड, पोकों सागर गवळी, ने. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे, पथकातील अनिस शेख,  मोहन मनसावाले, ने. स्थानिक गुन्हे शाखा, तसेच मा. जिल्हादंडाधिकारी, कार्यालयाकडील उत्कर्ष देवकुळे, व विलास म्हेत्रे व इतर अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज केला आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button