BIG Breaking:- सामुहिक बलात्कार करणा-या एकुण ११ आरोपीपैकी ०८ आरोपींना दुहेरी जन्मठेप तर ०३ आरोपींना २० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली…
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, यात हकीकत अशी की, यातील पिडीत फिर्यादी ही मागास जातीची सदस्य आहे. यातील आरोपी हे अमागास जातीचे सदस्य आहेत. यातील पिडीत मुलगी ही ऑगस्ट् २०१९ पासून सोलापूर येथे एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असताना घटनेपूर्वी सुमारे दीड महिन्या अगोदर तिची अॅऑटो रिक्षा चालक आरोपी सचिन राठोड रा. प्रतापनगर तांडा विजापूर रोड सोलापूर याचेसोबत ओळख झाली.
यातील पिडीत । व आरोपी सचिन राठोड यांची ओळख झाल्यानंतर त्यांचे
रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपी सचिन राठोड याने पिडीत मुलीस त्याचे अटो रिक्षातून सोलापूरचे शहरा बाहेरील असलेल्या येथील एका लॉजमध्ये नेवून, “तुला पत्नीचा दर्जा देतो” असे आश्वासन देवून तिचेवर जबरदस्तीने शारीरीक संभोग केला व तिला सोलापूर येथे आणून सोडल्यानंतर ती रंगभवन येथून घराकडे जात असताना आरोपी राज उर्फ राजकुमार देसाई याने पिडीत मुलीस त्याचे रिक्षातून सोलापूर येथील एका मैदानामध्ये जबरदस्तीने शारीरीक संभोग केला. त्यानंतर काही दिवसांनी यातील पिडीत मुलगी ही सायंकाळी ०५.०० वा. चे सुमारास चालत जात असताना आरोपी प्रविण राठोड याने तिला, “स्टँडला येणार का?” असे म्हणाल्यानंतर पिडीत ही त्या रिक्षामध्ये बसली त्यानंतर आरोपी प्रविण राठोड याने सदर रिक्षातून पिडीत मुलीस सोलापूरच्या शहराबाहेरील असलेल्या एका लॉजवर नेवून पिडीत मुलीशी जबरदस्तीने शारीरीक संभोग केला. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी प्रविण राठोड याने त्याचा मित्र आरोपी राजवीर याचेसह त्याचे रिक्षातून पिडीत मुलगी शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी येवून पिडीत मुलीस रिक्षामधून सोलापूरच्या पुढे असलेल्या एका लॉजवर नेवून आरोपी राजवीर याने तिचेशी जबरदस्तीने शारीरीक संभोग केला.
त्यानंतर यातील पिडीत मुलीने तिची मैत्रीण पार्वती राठोड हिच्या भावाची शायरीची वही आरोपी राजवीर यास दिल्यानंतर त्याने ती वही आरोपी प्रविण राठोड यास दिलेली होती. त्यानंतर आरोपी अक्षय व सतीश यांनी एका अॅऑटो रिक्षातून येवून पिडीत मुलीस, “प्रविणने बोलवले आहे, शायरीची वही दयायची आहे” असे म्हणून पिडीत मुलीस रिक्षातून सोलापूर शहराबाहेरील जंगलात घेवून जात असताना आरोपी प्रविण राठोड यास फोन करून जंगलात बोलावून घेवून तेथे त्या तिघांनीही पिडीत मुलीशी जबरदस्स्रीने आळीपाळीने शारीरीक रांभोग केला. त्यानंतर चार पाच दिवसांनी आरोपी प्रविण राठोड याने त्याच्या रिक्षातून पिडीत मुलीस ती शिक्षण घेत असलेल्या रोडवर घेवून गेला त्या ठिकाणी त्याचे मित्र आरोपी अक्षय व आरोपी रोहीत हे कारसह थांबलेले असताना आरोपी प्रविण राठोड याने पिडीत मुलीस त्या कारमध्ये बसण्यास सांगितल्याने पिडीत मुलगी त्या कारमध्ये बसल्यानंतर आरोपी अक्षय व रोहीत यांनी पिडीत मुलीस कारमधून जुळे सोलापूर भागामध्ये एका मैदानात नेवून कारमध्येच आळीपाळीने तिचेशी जबरदस्तीने शारीरीक संभोग केला. त्यानंतर काही दिवसांनी यातील पिडीत मुलगी ही कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना आरोपी रोहीत व त्याचे दोन मित्र आरोपी टिकटॉक किंग व आरोपी चेतन यांनी आरोपी रोहीत याचे कारमधून पिडीत मुलीस जुळे सोलापूर परिसरात नेवून कारमध्येच आळीपाळीने तिचेशी जबरदस्तीने शारीरीक संभोग केला व सात रस्ता सोलापूर येथे आणून सोडले.
या प्रकरणातील पिडीतेवर गेले सुमारे दीड महिन्यांपूर्वी यातील पिडीत ही कॉलेजला येत असताना आरोपी गौरव भोसले याचेशी पिडीत मुलीची ओळख
झाल्यानंतर त्याने तिला त्याचे रिक्षातून अक्कलकोटचे पुढे एका ठिकाणी झाडाझुडपात नेवून, “मी तुझ्यासोबत लग्म करतो, तुझी जबाबदारी घेतो, तुझा माझ्यावर विश्वास आहे का, तुझं माइसावर प्रेम आहे का, तुला चांगले चालत नाहीत” असे म्हणून तिला चापट मारून, गळा दाबून तिचेशी जबरदस्तीने शारीरीक संभोग केला. फिर्याद देण्यापूर्वी दिड महिन्यापासून आरोपी प्रविण राठोड याने पिडीत मुलीचा पाठलाग करून तिला त्याचे रिक्षात बस असे म्हणत होता. तसेच आरोपी सचिन राठोड याने दिनांक ११/०२/२०२० रोजी पिडीत मुलीस, “दुपारी कॉलेजला सुट्टी कर, लॉजवर फिरायला जावू” असे म्हणून वारंवार मानसिक त्रास दिला म्हणून वगैरे मजकूरची फिर्याद विजापूर नाका पोलीस स्ट्रेशन येथे दाखल केली. त्यानूसार सदर गुन्हयाचा तपास यातील तपासिक अंमलदार यांनी करून मा. न्यायालयामध्ये वर नमूद आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
सदर कामी शासनातर्फे एकूण ३८ साक्षीदार तपासण्यात आले. पिडिता, तिची आई, ओळख परेड, पंच, घटनास्थळचा पंचनामा, वैदयकिय अधिकारी, यातील तपासिक अधिकारी, नोडल ऑफिसर व घटनास्थळाचे फोटो काढणारे फोटो ग्राफर, गुगल मॅपिंगने आरोपींचे घटनेदिवशीची घटनास्थळी असलेली उपस्थिती (Exact Location) व मोबाईलचे टॉवर लोकेशन याबाबत सरकारी साक्षीदाराने मा. न्यायालयामध्ये दिलेली साक्ष या सर्वांचे जबाब महत्वाचे ठरले,
यात जिल्हा सरकारी वकील श्री. प्रदिपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तीवाद असा की, सदर गुन्हाच्याकामी विविध ठिकाणाचे एकुण ०७ घटनास्थळे तपासण्यात आले आहेत. सदर गुन्हयाबाबत मा. न्धायालयामध्ये एकूण ०८ दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. सदरच्या गुन्हयांत आरोपींना सदरची पिडीता ही अल्पवयीन असल्याचे व ती मागासवर्गीय जातीची असल्पाचे माहित असताना देखील तिच्यावर आळीपाळीने तिच्या इच्छेविरुद्ध जबर संभोग केला व सदरची घटना कोणास सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिली तसेच शिवीगाळ केली. सदरच्या घटनेबाबत विविध ठिकाणाचे एकूण ०७ घटनस्थाळांचे पंचनामे, सदर गुन्हयांतील ११ आरोपीविरूद्ध दाखल असलेले एकूण ०८ दोषारोपपत्रे, साक्षीदार, घटनेच्यावेळी घटनास्थळावर सापडलेल्या वस्तू, निवेदन पंचनामा व इतर पंचनामे घटनेनंतर आरोपी त्यांचे नातेवाईकाकडे कर्नाटकात जाउन लपले होते तेथील साक्षीदारांची साक्ष, आरोपीने गुन्हयात वापरलेले वाहन ज्या विक्रेत्याकडून विकत घेतले होते त्या विक्रेत्याची साक्ष, घटनेतील आरोपी अनेळखी असल्याने त्यांची ओळख परेड घेण्यात आली होती त्याचे नायब तहसिलदारा ची साक्ष, पिडीतेची मानसिक स्थिती घटनेवेळी व नंतर खालावली होती त्याला अनुसरून मनोविकार तज्ञांची साक्ष, पिडीतेची वैद्यकीय तपासणी करणा-या डॉक्टरांची साक्ष, पिडीता शिक्षण घेत असलेल्या शिक्षणसंस्थेतील शिक्षकांची साक्ष, घटनास्थळावर आरोपींच्या ताब्यातील काही वस्तू सापडल्या होत्या त्याची मालकी दर्शविणा-या साक्षीदारांची साक्ष, आरोपी ज्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होते तेथील साक्षीदारांची साक्ष, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणा-या डॉक्टरांची साक्ष, पिडीता ही एका मंदीराजवळ अस्वस्थ होवून आत्महत्या करण्याच्या विचारात रडत बसली होती त्यावेळी तेथे एका सामाजिक कार्यकर्त्याने तिची विचारपूस करुन तिला पोलीसांचे हवाली केले होते त्या सामाजिक कार्यकर्त्याची साक्ष, पिडीता मागावर्गीय असल्याने तिचे जात प्रमाणपत्र देणा-या अधिका-याची साक्ष इत्यादी भक्कम पुरावा आरोपीविरुद्ध न्यायालयात सरकार पक्षाचे वतीन सादर करुन युक्तीवाद करण्यात आला. त्याप्रमाणे सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन मा. श्रीमान एस. व्ही. केंद्रे साहेब, तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश-१, सोलापूर यांनी आरोपीनी सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी नं. १) सचिन श्रीकांत राठोड, २) राज ऊर्फ राजकुमार सिद्राम देसाई ३) गौरव विलास भोसले या तिन्ही आरोपींना पोक्सो कायदा कलम ३ व ४ खाली २० वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने कारावास तसेच कलम पोक्सो कायदा कलम ५ व ६ खाली २० वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने कारावास तसेच ५०६ भादवि खाली दोन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास तसेच आरोपी ४) प्रविण श्रीकांत राठोड ५) आनंद उर्फ राजविर राम राठोड ६) गणेश ऊर्फ अक्षय विष्णू चव्हाण ७) रोहित शाम राठोड ८) दिनेश परशू राठोड (टिकटोंक किंग) ९) चेतन राम राठोड १०) करण विजयकांत भरले ११) सतीश अशोक जाधव या सर्व आरोपींना पोक्सो कायदा कलम ३ व ४ खाली जन्मठेप तसेच १० हजार रुपये दंड, दंड न भरल्पास दोन महिने कारावास तसेच ५ व ६ खाली जन्मठेप तसेच १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने कारावास भादवि ५०६ खाली दोन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास. म्हणजेच सदर प्रकरणात एकूण ०८ आरोपींना दुहेरी जन्मठेप तर ०३ आरोपींना २० आणि २० वर्षांच्या दोन शिक्षा आणि प्रत्येक आरोपींना (एकुण ११ आरोपी) सर्व गुन्हयांत मिळून प्रत्येकी २१ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठोवली.
सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अॅड. नागराज सुदाम शिंदे, अॅड. ईस्माईल शेख, अॅड. सुरेश चव्हाण, अॅड. एस. एम. झुरळे व अॅड. फिरोज शेख यांनी काम पाहिले. तसेच यातील तपासिक अधिकारी म्हणून डॉ. प्रिती टिपरे, पोलीस सहायक पोलीस आयुक्त विभाग- २ सोलापूर शहर व पोलीस हवालदार दिपक चव्हाण यांनी सदर गुन्हाचा तपास केला. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार विक्रांत कोकणे व पोलीस हवालदार सुनंदा घाडगे यांनी काम पाहिले