entertainmentindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान जपण्यासाठी ११ मार्चला सोलापूरमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ !

 

 

सोलापूर

 

 

हिंदु धर्म आणि संस्कृतीवर होत असलेल्या विविध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक आघातांविषयी जनजागृती करण्यासाठी सोलापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा बुधवार, ११ मार्च २०२६ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता भवानी पेठ येथील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर होणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी *सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी, संत तुकाराम बाबा जोशी मठाचे मठाधीश ह.भ.प. धर्मनाथ महाराज जोशी, माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी,  आजोबा गणपती मंडळाचे विश्वस्त श्री. योगीनाथ फुलारी, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ ट्रस्टचे पिठासीन धर्माधिकारी प्रसाद पंडित आणि हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे उपस्थित होते.

 

 

 

 

 

या प्रसंगी  राजन बुणगे यांनी सांगितले की, या सभेत लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) मनोजकुमार सिन्हा, सनातनच्या सदगुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे संघटक* यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मागील २ महिन्यांपासून सभेच्या निमित्ताने सोलापूर शहर तसेच आसपासच्या ७४ गावांमध्ये व्यापक प्रसार आणि मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे. प्रत्यक्ष बैठका, घरोघरी संपर्क, फलक लेखन, होर्डिंग्ज, हस्तपत्रके, भित्तीपत्रके, मेगाफोनवरून सभेची उद्घोषणा, प्रसार फेरी, वाहनावर लावलेले स्टिकर, स्टँडी, टीव्ही चॅनल आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून १ लाख हून अधिक नागरिकांपर्यंत सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे.

 

 

 

सभा यशस्वी होण्यासाठी अनेक धार्मिक आणि सार्वजनिक क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. अनेक धार्मिक संस्था, पुरोहित संघटना, ज्ञाती संस्था, शिवजयंती आणि गणेशोत्सव मंडळे यांनी स्वतःहून सभेचा प्रसार केलेला आहे. सभेच्या प्रसारात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता त्यांनी १६ हजारांहून अधिक नागरिकांना घरभेटींद्वारे सभेचे निमंत्रण दिले. तसेच २०० हून अधिक ठिकाणी फलक लेखन, ८ व्याख्याने यांच्या माध्यमातून सभेचा प्रसार केला आहे.

 

 

 

 

आतापर्यंत २०० हून अधिक बैठका, २ प्रसार फेर्‍या, दुचाकीवर मेगाफोन वरून शहर आणि ग्रामीण भागांत प्रत्येक वाड्यावस्तीवर जाऊन सभेचा संदेश देण्यात आला आणि हस्तपत्रके, अत्यंत आकर्षक असे भित्तीपत्रके, रिक्षा आणि दुचाकीवर शिवाजीमहाराजांचे चित्र असलेले स्टिकर, आणि होर्डिंगच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागांत सुमारे १ लाखांहून अधिक जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे सभेला हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित रहाणार आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button