india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

हिंदवी सेनेकडून भव्य वसुबारस साजरी

 

 

सोलापूर :

 

 

हिंदवी सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वसुबारस निमित्त भव्य स्वरूपात गोपूजनाचा कार्यक्रम सोलापूर शहरातील बाळीवेस चौकात आयोजित करण्यात आला. यावेळी गाई व वासराचे विधिवत पूजन करण्यात आले.

 

 

 

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई देवकर, नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक बिजू अण्णा प्रधाने, नगरसेवक किसन अण्णा जाधव, गोरक्षक शिवराज गायकवाड, तेजामृत गोशाळेचे अध्यक्ष देविदास मेटकरी, भारतीय दलित महासंघ बार्शी तालुका अध्यक्ष मल्हारी ठोंबरे सर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष नायकू, उद्योगपती नितीन देशमुख, सामाजिक कार्यकर्ते गणेश करपेकर, हिंदवी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर बहिरवाडे उपस्थित होते.

 

 

यावेळी हिंदवी सेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हिंदवी सेनेचे प्रमोद चिंचणीकर यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी हिंदवी सेनेचे अमित राऊत, अंबादास शेतशिंदे, प्रशांत पवार, गोरक्षक प्रमुख प्रसाद झेंडगे, गोरक्षक लतेश हिरवे, राहुल साठे, विनायक पाटील, सुमित लांडगे, अभिजीत जाधव, राहुल कांबळे, सुमित कोष्टी, प्रशांत गुत्तीकोंडा, अक्षय बनसोडे, राहुल येलमोटे, अर्जुन मोहिते, अविनाश हजारे असे अनेक गोरक्षक व कार्यकर्ते प्रमुख उपस्थितीमध्ये होते.

 

 

 

 

नगरसेवक बिज्जु आण्णा प्रधाने यांनी एक पिकप गाडी चारा गोमातेला दान केला

*ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण यांचे मनोगत :*

आज वसुबारसच्या या पवित्र दिवशी बाळीवेस चौकात हिंदवी सेनेने आयोजित केलेल्या या भव्य गोपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले, हे मी माझे परम भाग्य समजतो.

वसुबारस म्हणजे केवळ एक सण नाही, तर ती आपली संस्कृती आहे, आपला धर्म आहे, आपली परंपरा आहे. गाय ही आपली माता आहे. ज्या घरात गाय आहे, त्या घरात लक्ष्मी वास करते, असे आपले शास्त्र सांगते. गाईच्या ठायी तेहतीस कोटी देवता वास करतात. म्हणून गाईची पूजा करणे म्हणजे प्रत्यक्ष देवाची पूजा करणे होय.

आज आपण गाईची पूजा केली, वासराची पूजा केली. यातून आपण पुढच्या पिढीला एक संदेश देतो आहोत की, गाय ही केवळ एक प्राणी नाही, तर ती आपली आई आहे, आपली देवता आहे.

 

 

 

आजच्या काळात गोमातेची अवस्था अत्यंत वाईट आहे. गाई रस्त्यावर फिरतात, प्लास्टिक खातात, कत्तलखान्यात जातात. हे पाहून मन हेलावून जाते. हिंदवी सेनेसारख्या संघटना गोरक्षणासाठी जे काम करतात, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. सुधीर बहिरवाडे आणि त्यांचे सर्व गोरक्षक सहकारी रात्रंदिवस गाईच्या रक्षणासाठी झटतात, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो.

मी आज या व्यासपीठावरून सर्वांना एकच विनंती करतो, आपण फक्त वसुबारसच्या दिवशीच गाईची पूजा करू नका, तर वर्षाचे ३६५ दिवस गाईचे रक्षण करा. आपल्या घरातील एक घास गाईसाठी काढा. गोशाळेला मदत करा. गाईला वाचवा, म्हणजेच धर्माला वाचवा.

 

 

 

 

गाय वाचली तर देश वाचेल, धर्म वाचेल, संस्कृती वाचेल. गोमाता हीच आपली खरी संपत्ती आहे.

आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या हिंदवी सेनेचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. अशाच प्रकारचे धार्मिक कार्यक्रम दरवर्षी होत राहोत, आणि हिंदू धर्माचा झेंडा असाच फडकत राहो, हीच गोमातेच्या चरणी प्रार्थना करतो.

*जय गोमाता ! जय श्रीराम ! जय शिवराय !*

*हिंदवी सेना, सोलापूर, महाराष्ट्र राज्य*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button