india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’चा नारा देत सोलापुरात भव्य दुचाकी रॅली; सुरेश पाटील व बाबुराव जमादार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह

सोलापूर-

 

“लोकशाही वाचवा, अराजकता हटवा”, लोकशाहीचे रक्षण, संविधानाचा सन्मान आणि देशहिताचा आवाज बुलंद करण्याच्या संकल्पाने भाजप-शिवसेना महायुतीच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग ३ मध्ये भव्य-दिव्य मोटारसायकल रॅलीचे (मोर्चा) आयोजन करण्यात आले होते. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि सोलापूरचे दमदार आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक दुचाकी रॅली काढण्यात आली.
माजी नगरसेवक सुरेश पाटील व बाबुराव जमादार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली बुधवारी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. ही रॅली पुढे महात्मा बसवेश्वर महाराज चौक येथे पोहोचली. बिपीन पाटील व उमेश जमादार यांच्या नियोजनाखाली या मोर्चाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

हातात राष्ट्रध्वज, दुचाकींवर फडकणारे ध्वज आणि उपस्थितांच्या गगनभेदी घोषणांमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. “लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी आणि देशहिताचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे”, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शेकडो मोटारसायकलींच्या या शिस्तबद्ध आणि भव्य रॅलीने सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
या भव्य रॅली व मोर्चामध्ये घोंगडे वस्ती, मड्डी वस्ती, भवानी पेठ, इंदिरा वसाहत, जोडभावी पेठ भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 

 


यावेळी विनायक पाटील, मुदका करली, शिवा मंदकल, रवी कावळे, पप्पू जोशी, दीपक दुधाळे, व्यंकटेश जाटगल, विजय कोळी, विकी जाटगल, नितीन चिलवेरी, मलू कोळी, लक्ष्मण पुजारी, कुमार शिसगीकर, नागू कोळी, अफसर नालवार, सिद्धू मंदकल, श्रीकांत दासरी, गोपाळ कुर्ले, सिंधू हळी, प्रवीण डोळे, प्रवीण कैरमकोंडा, बिलाल इनामदार, रमेश पेद्दी, आकाश अवाल, दिनेश पाटील, संतोष कोळी, सिद्धारूढ गंदाळकर, दीपक करली, संतोष करली, प्रकाश पुजारी, प्रकाश साळुंखे, व्यंकटेश डोळे, विनायक डोळे, यशवंत पुराणिक, महेबूब नालवार, मुजाहिद शिरवार, अमर म्हाडा, शिवा हळी, जबना होसमनी, प्रशांत गाडेकर, विनायक गंदाळकर, अप्पू उळागडे, अंपना पाटील, बाळू गुब्याडकर, संतोष जेरकल, चंदू कोळी, जिंदा गजेळी, प्रकाश करली, वीरपक्ष करली, बुद्धेपा पुजारी, रमेश सरवदे, अंबरेश पाटील, कृष्णा पाटील, नानी गुज्जा, अमृत बोड्याल, भिमा पुजारी, सिद्धारूढ मंदकल, अवि पुजारी, आकाश जमादार, गोविंद संगा यांसह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button