india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

एसआरपीएफ गट क्रमांक १० मध्ये पदोन्नतीचा आनंद! नऊ कर्मचाऱ्यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

समादेशक दीपाली काळे यांच्या आदेशाने नऊ कर्मचाऱ्यांना पदोन्नती; एसआरपीएफ गट क्रमांक १० मध्ये आनंदोत्सव...

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० मधील नऊ कर्मचाऱ्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती
समादेशक दीपाली काळे यांच्या आदेशान्वये पदोन्नतीचे अधिकृत परिपत्रक जारी; नूतन अधिकाऱ्यांचे अभिनंदन
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० मधील नऊ कर्मचाऱ्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती मिळाली आहे.

 

 

 

समादेशक दीपाली काळे यांच्या आदेशान्वये ही पदोन्नती प्रक्रिया पार पडली असून, संबंधित कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवा प्रवेश दिनांकानुसार सेवा ज्येष्ठता तसेच पदोन्नतीसाठी लागू असलेल्या पात्रता अटी व नियमानुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे.
शासनाच्या ७ मे २०२१ रोजीच्या आदेशातील तरतुदींनुसार तसेच २५ मे २००४ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठतेचा विचार करून ही पदोन्नती करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक समादेशक दीपाली काळे यांनी नुकतेच प्रसिद्ध केले.

 

 

 

पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये बापू मधुकर लोंढे, महादेव एकनाथ बारावकर, सुशील भारत घरबुडवे, महादेव करडे, संतोष जाधव, पुंडलिक चौधरी, जाकीर तय्यब शेख, संतोष राजाराम काळे आणि शंकर बोऱ्हाडे यांचा समावेश आहे.
या नऊ कर्मचाऱ्यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याने राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० मध्ये आनंदाचे वातावरण आहे. नूतन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचे समादेशक दीपाली काळे यांनी अभिनंदन करून पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button