crimeEpaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

“ऑनलाईन फसवणूक” ॲनेटा या अज्ञात व्यक्तीविरूद्ध तपासाबाबत सुनावणी:- ॲड. शशि कुलकर्णी…

 

सोलापूरः

 

जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये सी.सी.एच. क्लॉऊड
माईनर ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परतावा मिळवून देणार म्हणून सोलापूरातील ८३ गुंतवणूकदार यांच्या रु. ९१,३९,१७२/- रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणीच्या खटल्याची सुनावणी सोलापूर येथील विशेष न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये अनंत येरंकल्लू व जयंत येरंकल्लू यांनी त्यांना फसवणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी ॲनेटा व इतर उर्वरित आरोपी यांचे संदर्भात तपास कागदपत्रे अहवालासहित कोर्टासमोर ठेवणेबाबत तपास अधिकारी यांना आदेश होणेबाबत मागणी केलेली असून त्याची पुढील सुनावणीसाठी तारीख निश्चित केली आहे.

 

 

 

 

याची हकीकत अशी की, सी.सी.एच. क्लॉऊड माईनर या ॲपच्या माध्यमातून सोलापुरातील ८३ गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. त्याबाबत फौजदार चावडी, पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास होऊन येरंकल्लू बंधू व इतर १२ व त्यासंबंधी व्यक्ती अशा सर्व लोकांविरूद्ध फसवणूक व ठेवी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास होऊन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यान आरोपी जयंत येरंकल्लू यांनी सदर प्रकरणात, ते स्वतः पिडित व्यक्ती आहेत, त्यांचीच फसवणूक झालेली आहे, ॲनेटा या अज्ञात व्यक्तीने व्हॉटसप ग्रुपद्वारे त्यांचीच फसवणूक केली आहे, त्याबाबत तपास होणे गरजेचे आहे, त्याबाबत तपासादरम्यानच अर्ज दिला होता, परंतु त्यावर कोणताही तपास अहवाल न्यायालयात सादर नाही, त्या व्यक्तीचा छडा लागावा, म्हणून त्यासंबंधी तपासाची कागदपत्रे मे. कोर्टात दाखल व्हावीत, अशा कथनाचा अर्ज त्यांनी न्यायालयात दिला. त्यावर सरकार पक्षाने अर्जास तीव्र हरकत घेतली आहे. सदर ॲनेटा या व इतर व्यक्तीच्या तपासाबाबत येरंकल्लूचे सदर अर्जावर दि. 03/11/2026रोजी पुढील
सुनावणीसाठी तारीख निश्चित केली आहे.

 

 

 

 

सदर कामी आरोपी अनंत येरंकल्लू, जयंत येरंकल्लू, तर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. प्रसाद अग्निहोत्री, आणि सरकारतर्फे अॅड. पी. एस. जन्नू हे काम पहात आहेत.

केस क्र.

स्पे. केस क्र. ७०/२०२३

कोर्ट

मा. विशेष न्यायाधीश श्री. डी. एन. सुरवसे साहेब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button