india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

४ नोव्हेंबरच्या काँग्रेसविरोधी मोर्चाच्या नियोजनासाठी भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक

मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापौर विनायक कोंड्याल यांचे आवाहन; प्रत्येक नगरसेवकावर जबाबदारी सोपविण्यात आली

 

सोलापूर

 

काँग्रेसकडून सातत्याने फेक नॅरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल केली जात असल्याच्या आरोपाच्या निषेधार्थ येत्या ४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाच्या नियोजनासाठी आज महापालिकेतील सभागृह नेते यांच्या कार्यालयात भाजपच्या सर्व नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई देवकर,सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजीताताई चाकोते, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नगरसेवकांना मोर्चाचे स्वरूप, मोर्चाचा मार्ग, नियोजन, सहभाग तसेच विविध जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

 

 

यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, काँग्रेसकडून जाणीवपूर्वक चुकीची माहिती आणि फेक नॅरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकाराला योग्य उत्तर देण्यासाठी आणि जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी हा मोर्चा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार असून, सोलापूर शहराचाही सहभाग भव्य आणि प्रभावी असला पाहिजे.

 

 

 

प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी समन्वय साधून मोर्चाच्या यशस्वितेसाठी दिलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी. प्रभागनिहाय नियोजन करून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी करून घ्यावे. सर्वांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास हा मोर्चा निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला.

 

 

 

 

बैठकीत मोर्चाच्या दिवशी उपस्थिती, कार्यकर्त्यांची जमवाजमव, वाहतूक व समन्वय तसेच नियोजनाच्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या स्तरावर तयारीला लागून मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

 

४ नोव्हेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातून निघणाऱ्या या मोर्चात सोलापूर शहराचा भव्य सहभाग नोंदविण्यासाठी सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button