crime

शहर गुन्हे शाखेकडून अंमली पदार्थ विरोधात धडाकेबाज कारवाई एकूण ४८ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…

सोलापूर शहरामध्ये अंमली पदार्थ खरेदी – विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी अंमलदार यांना वेळोवेळी आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने दिनांक २८/१०/ २०२६ रोजी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलिस कॉन्स्टेबल राजकुमार वाघमारे , पोलिस कॉन्स्टेबल काशिनाथ वाघे , महिला पोलिस हवालदार निलोफर तांबोळी असे सोलापूर शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील भारत नगर क्रीडा संकुल भिंतीजवळ परिसरात गस्त करीत असताना पथकातील पोलिस अंमलदार भारत पाटील यांना एक संशयित इसम घराच्या बाहेर बसून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काहीतरी संशयास्पद चीज वस्तू विक्री करीता बसल्याचे दिसून आले.त्यावेळी नमूद पथकाने सदर ठिकाणी जाऊन संशयित इसमास शिताफीने पकडले.

नमूद इसमाकडे केलेल्या चौकशीत त्याचे नाव मुजमिल अल्ताफ शेख वय २० वर्षे राहणार घर नंबर ४०० भारत नगर क्रीडा संकुल जवळ , कुमठा नाका असे असल्याचे आढळले.त्यावेळी त्याच्या कब्जातील प्लास्टिकच्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ असल्याचे दिसून आले. त्यानंतर एन. डी. पी. एस. ॲक्ट अंतर्गत विहित एस. ओ. पी प्रमाणे ताब्यात घेतलेल्या इसमाची व त्याच्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीची झडती घेतली असता काळसर हिरवट रंगाचा उग्र वासाचा, बिया बोंडासह असलेला ओलसर गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. नमूद गांजा बाबत मुजमिल शेख यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आणखी गांजा घरात असल्याचे सांगितल्याप्रमाणे घरात जाऊन पाहणी केली असता आतमध्ये महिला नाव निलोफर इरफान शेख वय ३९ वर्षे राहणार घर नंबर ४०० भारत नगर क्रीडा संकुल जवळ , कुमठा नाका सोलापूर मिळून आली. या घर झडती मध्ये प्लास्टिक टेपने रॅप केलेली एकूण ४८ गांजाची पाकिटे मिळून आली.तत्काळ पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर कडील फॉरेन्सिक पथकाला तत्काळ आलेल्या काळसर हिरवट रंगाचा उग्र वासाचा , बियाबोंडासह असलेला ओलसर पदार्थाची रासायनिक तपासणी केली असता तो गांजा अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.

पुढील कारवाई मध्ये मिळून आलेल्या सर्व गांजाचे वजन ९६.९१ किलो असल्याचे दिसून आले.त्यानंतर एन. डी.पी . एस ॲक्ट अंतर्गत विहित एस. ओ. पी प्रमाणे संपूर्ण कार्यवाही करून आरोपी नाव मुजमिल अल्ताफ शेख व महिला आरोपी निलोफर इरफान शेख याच्या ताब्यात मिळालेला ९६.९१ किलो गांजा किंमत ४८ लाख. ४५ हजार ५०० रुपये व २५ हजार किमतीचा मोबाईल फोन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

त्यानंतर नमूद आरोपीं विरुद्ध सदर बझार पोलिस ठाणे सोलापूर शहर येथे एन. डी. पी. एस ॲक्ट कलम ८ ( क ) , २० { ब } , २ {क ) , २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे हे करीत आहेत.

आरोपी नाव मुजमिल अल्ताफ शेख यांच्या विरुद्ध दिनांक ९/०५/२०२५ रोजी सदर बझार पोलिस ठाण्यात एन. डी. पी. एस ॲक्ट कलम ८ { क} , २० { ब } अन्वये गुन्हा दाखल असून त्यामध्ये ८.१८२ किलो ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींना मे . न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना तपासाच्या अनुषंगाने ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे….

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अश्विनी पाटील , गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलिस निरीक्षक शबनम शेख नियंत्रण शाखा , सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, तुकाराम घाडगे , भरत चंदनशिव, व तपास पथकातील पोलिस अंमलदार भारत पाटील , शैलेश बुगड, अभिजित धायगुडे, राजकुमार वाघमारे, काशिनाथ वाघे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल निलोफर तांबोळी , सुमित्रा बारबोले , विजयकुमार वाळके, संजय साळुंखे , सिद्धाराम देशमुख , राजेश कोरे , सुभाष मुंढे, रामा भिंगारे, अजय गुंड, अजिंक्य माने वाहन चालक श्याम सुरवसे, बाळासाहेब काळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button