crimemaharashtrapoliticalsocialsolapur

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान टेंभुर्णीत मेफेड्रॉन ड्रग {MD } विक्री साठी घेऊन येणारा आरोपी अटकेत…

२५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...

सोलापूर

अंमली पदार्थ व त्याच्यापासून तयार झालेले इतर नशेचे पदार्थ यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असून सोलापूर ग्रामीण पोलिस दलाकडून देखील अमली पदार्थ विषयी जनजागृती व कारवाई करण्याबाबत विशेष मोहीम चालू आहे.दिनांक १४/१०/२०२६ रोजी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिह्यातील महत्वाच्या विभागाची बैठक घेऊन अंमली पदार्थाबाबत कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.ही बैठक झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थ विषयक गुन्हे करणाऱ्या इसमांवर लक्ष केंद्रित करून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते.

 

 

 

त्या अनुषंगाने दिनांक २१/१०/२०२६ ते दिनांक २२/१० / २०२६ रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप,सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे व त्यांच्या पथकासह पेट्रोलिंग करत असताना पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना गोपनीय बातमी दारामार्फत बातमी प्राप्त झाली की, टेंभुर्णी पोलिस ठाणे हद्दीत इसम नाव गौतम अजित भोसले राहणार वेणेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर हा सोलापूर – पुणे जाणाऱ्या हायवेवरील टेंभुर्णी शहरात कुर्डूवाडी ब्रीज शेजारी त्याच्या ताब्यातील किया सेल्टोस वाहन क्रमांक MH 47 AY 2136 मधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मेफेड्रॉन घेऊन येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुर्डूवाडी ब्रीज शेजारी सापळा रचला.तसेच पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, टेंभुर्णी पोलिस ठाणे व त्यांच्याकडील कर्मचारी यांनी घटनास्थळी पाठवले.

 

 

 

 

यातील इसम नाव गौतम अजित भोसले हा त्याच्या कडील चारचाकी वाहनांमधून मेफेड्रॉन MD ड्रग अमली पदार्थ विक्रीसाठी सोबत घेऊन येत असल्याने सदर इसमावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप , पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे व त्यांच्या कडील कर्मचारी असे कुर्डूवाडी कडे जाणाऱ्या ब्रीज शेजारी पंच फोटोग्राफर , वजन काट्या धारक, एफ. एस. एल स्टाफ यांच्या सह सापळा लावून थांबले असता काही वेळाने बातमी बातमी प्रमाणे सोलापूरकडून एक संशयित इसम चारचाकी वाहनाने कुर्डूवाडी ब्रिजच्या सर्विसरोडने येत असल्याचे दिसून आले.सदर इसम व वाहन ही बातमी प्रमाणेच असल्याची खात्री होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सापळा पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना इशारा करून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

 

 

संबंधित व्यक्ती जवळ येताच पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी त्यांच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना इशारा करून जागीच पकडले. .त्यानंतर त्या इसमास त्याचे नाव व पत्ता विचारताच त्याने त्याचे नाव गौतम अजित भोसले वय 38 वर्षे राहणार वेणेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर असे असल्याचे सांगितले.

पोलिस पथकाने गौतम अजित भोसले याची अंगझाडती घेतली असता ,त्याच्या ताब्यात 5.52 ग्रॅम मेफेड्रॉन { MD } हा १६ , ५०० रु.किमतीचा अंमली पदार्थ, किया कंपनीची सेल्टोस ही चारचाकी वाहन व दोन मोबाईल , वजन काटा, रोख रक्कम इ.मुद्देमाल मिळून आला.या इसमास अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने पंचा समक्ष कबुली दिली.

 

 

 

 

या मध्ये त्याने त्याचे इतर दोन साथीदार असे अमली पदार्थ आणण्यासाठी ओडिसा येथे त्याच्या सेल्टोस वाहन क्रमांक एम .एच ४७ ए. वाच २१३६ व एस. कॉस गाडी क्रमांक एम.एच १२ एम .एफ ४२१३ ने गेलेले होते. आरोपी याच्या कडून एकूण २१ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी गौतम अजित भोसले वय ३६ वर्षे राहणार वेणेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात एन . डी. पी. एस ॲक्ट १९८५ कलम ८{क } , २२(ब } अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला मे. न्यायालय समक्ष हजर केले असता त्याची दिनांक २८/१०/२०२६ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे,नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा हे करीत आहेत.

या इसम विरुद्ध यापूर्वी टेंभूर्णी पोलिस ठाण्यात एन. डी. पी. एस. ॲक्ट १९८५ कलम २०(ब ) , { क } अन्वये तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३९५,३९७ , ३६४ { अ} नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दिनांक २४/१०/२०२६ रोजी सोलापूर ग्रामीण हद्दीतील पंढरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीत रांजणी तालुका पंढरपूर गावच्या शिवारात एक इसम गांजा बाळगला असल्याची गोपनीय माहिती मिळून आली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करून इसम पंकेश मोहन दांडगे राहणार रांजणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या घरा शेजारील गट शेतात तपासणी केली असता शेतामधून कापून भारे बांधून ठेवलेला एकूण ७ किलो ६२० ग्रॅम गांजा मिळून आला आहे. या पदार्थाची अंदाजे किंमत ३ लाख ८१ हजार मुद्देमाल मिळून आला. ही कारवाई पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली.

सोलापूर ग्रामीण हद्दीमध्ये पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वामध्ये १ जानेवारी २०२६ ते अद्याप पर्यंत एन. डी. पी . एस कायद्यांतर्गत ९१ गुन्हे दाखल करण्यात आले असून २५ गुन्ह्यामध्ये २ कोटी ५१ लाख २७ हजार दीडशे रुपयांचा अंमली पदार्थ व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला .तसेच ६६ इसमा विरूद्ध अंमली पदार्थ सेवनाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्हि. एस.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लवार, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, संजय राठोड , विजय शिंदे , पोलिस उपनिरीक्षक राहुल गरड, पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले , पोलिस हवालदार संजय देवकर, आबा मुंढे, शितल उघडे , मनोज भंडारी पंकज महिंद्रकर व्यंकटेश मोरे, विरेश कलशेट्टी, दशरथ मोरे , अतुल घाडगे , महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी गोटे, पोलिस अंमलदार हरीश थोरात, सागर ढोरे – पाटील , प्रमोद शिंपाळे, राहुल दोरकर, बाळासाहेब घाडगे , मनोज राठोड, विनायक घोरपडे, सूरज रामगुडे, अशोक हलसंगी तसेच टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे गणेश इंगोले, माऊली सरडे, दत्तात्रय वजाळे , मरकड , नितीन चव्हाण, समाधान धोत्रे, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपक भोसले व पोलिस कॉन्स्टेबल सागर गवळी यांनी यशस्वी रित्या पार पाडली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button