india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

विद्यार्थ्यांनी मोबाईलपेक्षा वाचनात गुंतून जावे- श्रीकांत शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धांचा गुणगौरव समारंभ संपन्न

पंढरपूर-

 

कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील थोर शिक्षणप्रसारक, समाजसुधारक आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते. त्यांनी गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या जयंती निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालय पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध, रांगोळी स्पर्धा, दीप रंगोली स्पर्धा विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते संपन्न झाला.

 

 

 

यावेळी विद्यार्थ्यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्कुल बॅग ही वाटप करण्यात आले.
यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की यशवंत विद्यालया मधून सुसंस्कृत मुले घडवण्याचे काम गुरुजनवर्ग करत असतात आणि ह्या संस्काराची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांना भविष्यात आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हे संस्कार उपयोगी पडतात आज संपूर्ण देश मोबाईल मध्ये गुंतले असताना आपण वाचनाकडे लक्ष देऊन आपण त्यात गुंतून जाऊन आपले ध्येय साध्य केले पाहिजे विद्यार्थ्यांनो स्वप्ने मोठी पहा आणि पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी अगोदर त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती अनिता साळवे , वरिष्ठ लेखनिक श्री पंकज गोंजारी श्री मगर सर श्री बारले सर श्री पाटील सर श्रीमती सरिता काळे सुतार श्री धाईंजे सर, श्रीमती बागल मॅडम श्री अमोल बंगाळे सर आदि उपस्थित होते.

 

 

 

श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, कमवा आणि शिक्षा योजनेतून विद्यार्थ्यांनी काम करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवावा, ही संकल्पना कर्मवीर आण्णांनी प्रोत्साहित केली. बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांतील मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. सामाजिक समता यासाठी प्रयत्न करत जातिभेद दूर करून सर्वांना समान शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, यासाठी त्यांनी कार्य केले.

 

 

शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे, हा विचार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जनमानसात रुजवला. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिकलेले आज उच्च पदस्थ अधिकारी असो राजकीय उच्च पदावर असलेले नेते मंडळी हे आण्णांच्या विचारातून पुढे गेले आहेत ही अभिमानाची बाब आहे. असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button