जोडभावी पेठ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी; मोटारसायकल चोराकडून ०६ मोटारसायकली जप्त, ०५ गुन्हे उघडकीस

सोलापूर (प्रतिनिधी) :
सोलापूर शहरात नवरात्र महोत्सव काळात रुपाभवानी माता मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या मोटारसायकली चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. याच पार्श्वभूमीवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कामगिरी करत अट्टल मोटारसायकल चोराला अटक करून त्याच्याकडून ०६ मोटारसायकली हस्तगत केल्या असून ०५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजि.नं. ७२२/२०२६ बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे दि. २२/१०/२०२६ रोजी गुन्हा दाखल होता. फिर्यादी चनबसप्पा गुरशांतप्पा फताटे (वय ५०, व्यवसाय-शेती, रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी पूर्व मंगळवार पेठ कुंभारवेस येथे त्यांचे मामा अनिल संगप्पा डोळे यांचे राहते घरा समोर पार्क केलेली स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल क्र. MH-१३-AM-५०२४ ही अज्ञात चोरट्याने चोरी केल्याने गुन्हा दाखल झाला होता.
रुपाभवानी मंदिर परिसरात पार्किंग व्यवस्था नसल्याने भाविक रस्त्यावर गाड्या लावून दर्शनासाठी जातात. याच संधीचा फायदा घेऊन रेकॉर्डवरील सराईत आरोपी चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार डी.बी. पथकाचे प्रमुख सपोनि श्रीनाथ महाडिक, पोसई अमोल घोडके व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी पोहेकॉ शिवानंद लोहाार व पोहेकॉ खाजप्पा आरेनवर यांना रेकॉर्डवरील आरोपी *नागेश भीमाशंकर पाटील (वय ३९, रा. चंद्रशेटी अपार्टमेंट, घोंगडे वस्ती, सोलापूर)* याची चोरी करतानाची हालचाल आढळली. माहिती मिळताच सापळा रचून आरोपी प्रियंका चौक ते शेळगी ब्रिजकडे जात असताना पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोहेकॉ सागर सरतापे यांनी त्यास अटक करून सखोल तपास केला असता त्याच्याकडून एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ०६ मोटारसायकली जप्त* करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ अरुण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी, पो.नि. (गुन्हे) अमोल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीनाथ महाडिक, पोसई अमोल घोडके, पोहेकॉ शिवानंद लोहाार, पोहेकॉ खाजप्पा आरेनवर, पोहेकॉ सागर सरतापे, पोहेकॉ शितल शिवशरण, पोहेकॉ बसवराज स्वामी, पो.कॉ. स्वप्नील कसगावडे, पो.कॉ. रोहित शिंदे, मपोशि अनिता मोरे, पो.कॉ. सोमनाथ थिटे, पो.कॉ. किरण जाधव, पो.कॉ. निलेश मलाबदे, पो.कॉ. विठ्ठल काळजे, पो.कॉ. अमित कांबळे यांनी केली आहे.



