india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

प्रभाग २२‎ मध्ये‎ किसन‎ जाधव‎ यांच्या‎ नेतृत्वाखाली‎ पदवीधर, शिक्षक मतदारांपर्यंत‎ प्रचाराचा धडाका !

डॉ. स्मिता जाधव आणि‎ कौस्तुभ‎ गावडे‎ यांच्या विजयासाठी‎ भाजप‎ कार्यकर्त्यांची‎ जोरदार‎ मोर्चेबांधणी; पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे‎ यांचे‎ मोठ्या मताधिक्याने‎ विजयी‎ करण्याचे‎ आवाहन

 

 

सोलापूर‎

पुणे‎ पदवीधर आणि‎ पुणे शिक्षक‎ मतदारसंघाच्या निवडणुकीचा‎ प्रचार‎ अंतिम टप्प्यात आला असून,‎ सोलापूर‎ शहरातील‎ प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपचे नगरसेवक‎ किसन भाऊ जाधव यांच्या‎ नेतृत्वाखाली‎ प्रचाराला‎ वेग‎ आला आहे.‎ पदवीधर‎ आणि‎ शिक्षक‎ मतदारांशी थेट संवाद‎ साधत भाजप-महायुतीच्या‎ दोन्ही उमेदवारांना‎ मोठ्या मताधिक्याने विजयी‎ करण्यासाठी कार्यकर्त्यांनी‎ जोरदार‎ मोर्चेबांधणी केली‎ आहे‎ पुणे पदवीधर‎ मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या अधिकृत‎ उमेदवार‎ डॉ.‎ स्मिता‎ योगेश जाधव‎ आणि‎ पुणे‎ शिक्षक मतदारसंघाचे‎ अधिकृत‎ उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या‎ प्रचारासाठी‎ प्रभागात‎ नियोजनबद्ध‎ पद्धतीने‎ जनसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे.‎ मतदारांच्या‎ भेटीगाठी घेऊन‎ दोन्ही उमेदवारांची‎ भूमिका,‎ कार्य आणि‎ महायुतीची विकासाभिमुख विचारधारा मतदारांपर्यंत‎ पोहोचविण्यावर भर‎ दिला‎ जात‎ आहे.‎

 

 

मुख्यमंत्री‎ देवेंद्र‎ फडणवीस,‎ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र‎ चव्हाण,‎ पालकमंत्री जयकुमार‎ गोरे, आमदार‎ विजयकुमार‎ देशमुख, आमदार‎ सुभाष देशमुख,‎ आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर‎ शहर मध्यचे‎ युवा‎ आमदार‎ देवेंद्र कोठे‎ आणि भाजपच्या‎ शहराध्यक्ष‎ रोहिणी‎ तडवळकर यांच्या‎ मार्गदर्शनाखाली‎ ही प्रचार‎ मोहीम राबविण्यात‎ येत आहे भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या‎ मताधिक्याने निवडून‎ द्या,‎ असे आवाहन‎ पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे यांनी‎ केले‎ आहे. त्यांच्या या‎ आवाहनाला प्रतिसाद देत प्रभाग क्रमांक‎ २२‎ मधील भाजप कार्यकर्ते‎ पदवीधर‎ आणि शिक्षक‎ मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्रिय झाले‎ आहेत. मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, कार्यकर्त्यांची एकजूट‎ आणि‎ वरिष्ठ‎ नेत्यांचे मार्गदर्शन‎ यामुळे‎ दोन्ही‎ उमेदवारांच्या विजयासाठी अनुकूल‎ वातावरण‎ निर्माण‎ होत असल्याचा विश्वास नगरसेवक‎ किसन भाऊ जाधव यांनी‎ व्यक्त‎ केला.

 

 

या प्रचार मोहिमेत‎ नगरसेविका अंबिकाताई नागेश‎ अण्णा‎ गायकवाड, नगरसेविका‎ चैत्रालीताई शिवराज गायकवाड,‎ माजी नगरसेवक नागेश‎ अण्णा गायकवाड,‎ सामाजिक‎ कार्यकर्ते शिवराज गायकवाड, राजू‎ ब्रदर जाधव,‎ सुनील कांबळे,‎ युवा नेते चेतन‎ नागेश अण्णा‎ गायकवाड,‎ सुहास‎ जाधव,‎ संतोष जाधव,‎ अमोल‎ सरवळे, राहुल‎ शिंदे, अभिजीत कदम, शिरीष गायकवाड,‎ श्रीकांत गिड्डे‎ यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते सहभागी‎ झाले आहेत.‎ पदवीधर‎ आणि‎ शिक्षक मतदारांशी‎ सातत्याने संपर्क‎ साधत‎ दोन्ही‎ उमेदवारांच्या‎ विजयासाठी प्रभाग‎ क्रमांक २२ मधील‎ भाजप‎ कार्यकर्त्यांनी‎ प्रचाराची धुरा सांभाळली असून,‎ निवडणुकीच्या‎ अंतिम टप्प्यात प्रचार अधिक गतिमान झाला आहे.‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button