crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त…

 

सोलापूर

सोलापूर शहरातील अवैध शस्त्रविक्रीविरोधात एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताला अटक केली आहे. हुसेन अहमद मकबूलसाब कुमसी (वय ४१, रा. शिवगंगा नगर, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली.

 

 

 

 

पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत विमानतळाच्या पाठीमागील रस्त्याने सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर, सनराईज शाळेसमोरील मोकळ्या मैदानाजवळ एक व्यक्ती गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे आढळली. तसेच त्याच्याकडील मोटारसायकल क्रमांक MH-13-DA-7435 जप्त करण्यात आली. पुढील तपासात त्याच्याकडून आणखी एक गावठी पिस्तूल मिळून आल्याने पोलिसांनी एकूण दोन पिस्तुले जप्त केली

 

 

 

 

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही शस्त्रे आरोपीकडे कुठून आली, ती कोणाला विकली जाणार होती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

 

 

 

 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्काज शेख व त्यांच्या पथकाने केली. अवैध शस्त्रविक्री रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील शस्त्रतस्करीच्या संभाव्य नेटवर्कचा शोध घेण्यास मदत होणार आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button