30 आठवड्यांचा थैलीसेमिया ग्रस्त गर्भ संपुष्टात आणण्यास कोल्हापूर उच्च न्यायालयाची परवानगी:- ॲड. रितेश थोबडे….

सोलापूर दिनांक : 30
आठवड्यांची गर्भधारणा असलेल्या महिलेस तिचा गर्भसंपुष्टात आणण्यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय अहुजा व नीरज धोटे यांनी परवानगी दिली.
यात हकीकत अशी की, याचीका करतीस गर्भधारणा झाली होती व ती योग्य उपचार डॉक्टरांकडून घेत होते. त्यानंतर याचीका करती यांना समजले की गर्भातील बाळ हे थेलीसिमिया मेजर या आजाराने ग्रस्त असून त्यास जन्म दिल्यावर तो भविष्यात सामान्य माणसाचे माणसासारखे जीवन जगू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी गर्भसंपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. परंतु कायद्याने दिलेल्या वेळेपेक्षा गर्भधारणा ही पुढे गेली असल्याने गर्भधारणा संपुष्टात आणण्यास डॉक्टरांनी नकार दिला होता.
त्यावर याचिका करते यांनी एडवोकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी याचिका दाखल केली होती.
*याचिकेच्या सुनावणीच्या वेळी एडवोकेटर रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तीवादात वैद्यकीय मंडळांनी सादर केलेल्या अहवालात याचिका करती ही 30 आठवडे तीन दिवसाची गरोदर आहे. गर्भ हा थेलीसिमिया मेजर चा रुग्ण आहे. त्यामुळे शरीरात पुरेशी हिमोग्लोबिन तयार होणार नाही, आयुष्यभर रक्त चढवण्याची आवश्यकता भासते, मुलांमध्ये आपुरी वाढ होते त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळास आयुष्यभर आजारपणास सामोरे जावे लागेल. जर याचीका करतीस गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी नाही दिली तर तीस मानसिक,भावनिक व शारीरिक कष्ट होईल असा युक्तिवाद मांडला.
त्यावर न्यायमूर्तींनी गर्भधारणा संपुष्टात आणणेस परवानगी दिली.तसेच पुढे असेही नमूद केले की जर मुलाचा जन्म जिवंत झाला आणि याचिका करती ही अशा मुलाची जबाबदारी घेण्यास तयार नसेल तर राज्य किंवा त्यांच्या यंत्रणाना अशा मुलाची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल.
यात याचिकादारातर्फे एडवोकेट रितेश थोबडे तर सरकार तर्फे एडवोकेट तेजस करपे यांनी काम पाहिले.



