india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण केतनभाई शहा यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

१९ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन; चेअरमन इलेव्हनने पटकावले विजेतेपद

 

सोलापूर, दि. (प्रतिनिधी) :

 

भंडारी स्पोर्ट्स क्लब आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता. साखळी पद्धतीने स्पर्धेचे सामने खेळवण्यात आले.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. अखिल भारतीय जैन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष केतनभाई शहा यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

विजेत्या चेअरमन इलेव्हन संघाला २१ हजार रुपये आणि चषक, तर उपविजेत्या सेक्रेटरी इलेव्हन संघाला ११ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

 

 

 

यावेळी १९ वर्षांखालील संघ निवड समितीचे अध्यक्ष सुनील मालप, भंडारी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष महेश भंडारी, दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी, रणजित भंडारी, चंदू रेम्बरसु, किशोर बोरामणी आणि अमर पाटील उपस्थित होते.

 

 

 

 

भंडारी क्लबचे संयोजक शिवा अकलूजकर यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेंद्र गोटे यांनी आभार मानले. स्वर्गीय प्रवीणकुमार कांतीलालजी भंडारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जुळे सोलापूर येथील भंडारी स्पोर्ट्स ग्राउंडवर आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत चेअरमन इलेव्हन संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चेअरमन इलेव्हनने सेक्रेटरी इलेव्हन संघाचा ९१ धावांनी पराभव करून स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
प्रथम फलंदाजी करताना चेअरमन इलेव्हन संघाने ५० षटकांत सर्वबाद १७७ धावा केल्या. अनुज मुंदडा याने ८० धावांची दमदार खेळी केली, तर प्रीतम बायस याने नाबाद १९ धावा केल्या.

सेक्रेटरी इलेव्हनकडून पृथ्वीराज कणसे आणि सार्थक कन्ना यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. संकेत उबाळे, यश डोके, निखिल माळी आणि शौर्य राऊत यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

 

 

 

विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेला सेक्रेटरी इलेव्हन संघ ८६ धावांत सर्वबाद झाला. ययाती देवकते याने ३६, तर शौर्य राऊत याने २६ धावा केल्या. चेअरमन इलेव्हनकडून अनुज वाल्मिकी याने तीन बळी घेतले, तर निसर्ग शिवशरण आणि प्रीतम बायस यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

वैयक्तिक पुरस्कारांमध्ये चेअरमन इलेव्हनच्या अनुज मुंदडा याने सामनावीर आणि स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज हे दोन्ही पुरस्कार पटकावले. सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार अनुज वाल्मिकी याला, तर मालिकावीराचा बहुमान सार्थक कन्ना याला प्रदान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button