india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

विरोधकांचा नरेटीव्ह खोडून काढत दिमाखात धावली बंगळुरू – मुंबई स्लीपर वंदे भारत

महापौर विनायक कोंड्याल, आमदार देवेंद्र कोठे, खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत वंदे भारत रेल्वेचे रविवारी सोलापूरात स्वागत

 

सोलापूर : प्रतिनिधी

बंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही स्लीपर वंदे भारत रेल्वे सोलापूरमार्गे धावणार नाही असा खोटा प्रचार करणाऱ्या विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढत रविवारी रात्री ही वंदे भारत रेल्वे बंगळूरहून सोलापूरमार्गे मुंबईला रवाना झाली. महापौर विनायक कोंड्याल, आमदार देवेंद्र कोठे, खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत वंदे भारत रेल्वेचे रविवारी सोलापूरात स्वागत करण्यात आले.

बंगळुरू ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या मार्गावर वंदे भारतला मंजुरी मिळाल्यानंतर ही गाडी सोलापुरातून जाणार नसल्याचे विरोधकांकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे बंगळूरु ते मुंबई आणि मुंबई ते बंगळुरू या मार्गावर धावणारी स्लीपर वंदे भारत गाडी सोलापुरातूनच सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यामुळे सोलापूरकरांना मुंबई आणि बंगळुरूला जाण्यासाठी अतिरिक्त वंदे भारत रेल्वेची सोय झाली आहे.

यावेळी वंदे भारतच्या लोको पायलटचा सत्कार महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच लोको पायलटसह प्रवाशांशी संवाद साधून मान्यवरांनी प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून सोलापूर स्थानकावरून रवाना करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन, ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर विभागाचे डीआरएम डॉ. सुजित मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अंशुमाली कुमार, जयदीप प्रदक्षिणे, डीएमओ योगेश पाटील, डीएमई रामलाल प्यासे, असिस्टंट डीइएन पद्मनाभ झा, सौरभ कुमार, ए.के.सिंग, अतुल लोहकरे तसेच प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 


———-
कोट
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अनेक इतर अनेक नेत्यांकडून मेक इन इंडिया शक्य नसल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. मात्र मेक इन इंडिया अंतर्गतच तयार झालेली ही वंदे भारत सोलापुरातून धावताना आपण पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासदृष्टीचा सोलापूरकरांसह सर्व भारतीयांना अभिमान आहे. अतिरिक्त वंदे भारत गाडी सोलापूरला सुरू होण्यासाठी रेल्वे खात्याकडे यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समस्त सोलापूरकरांतर्फे आभार.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button