crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

अखेर महिलेला न्याय मिळण्याची आशा : वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड यांच्यासह दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, पोक्सो व इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल….

 

सोलापूर दि:-

 

सुशील वाल्मिक कराड व त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे व गोपी गंजेवार सर्व रा. परळी जिल्हा बीड याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर येथे गुन्हा दाखल.
या हकीकत अशी की, यातील महिलेचा पती हा सुशील कराड यांच्याकडे मार्केटिंग मॅनेजर व कम्प्युटर ऑपरेटर म्हणून कामास होता. महिलेने दोन बल कर दोन कार या 100% कर्जावर घेऊन ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत होती. तसेच तिने परळी वैजनाथ येथे एक प्लॉट देखील घेतला होता. सुशील कराड याने तिच्या पतीस तू एवढे कसे काय कमावला, तू ट्रक धंदा बंद कर, असे म्हणून मारहाण केली होती. दिनांक ६/५/२०२४ रोजी महिलेच्या पतीस ऑफिसमध्ये डांबून ठेवून रिवाल्वर लावून मारहाण केली होती व गाडीचे चाव्या तसेच कागदपत्रे काढून घेतले होते.

 

 

 

 

त्यानंतर रात्री अकराची सुमारास महिलेच्या पतीस घरी आणून सोडले. दिनांक ७/५/२०२४ रोजी सुशील कराड व त्याचे दोन साथीदार हे त्याच्या घरात घुसून लहान मुलांसह सर्वांना धाक दाखवून जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण केली व त्यांचे नावे असलेला प्लॉट हा दुसऱ्याच्या नावे खरेदी करण्यास भाग पाडले. त्यानंतर दिनांक १७/०५/२०२४ रोजी त्यांचे सोने हे बालाजी टाक ज्वेलर्स यास विकण्यास भाग पाडले व आलेले रक्कम ही सुशील कराड याने घेतली तसेच त्यांच्याकडून शंभर रुपयाच्या कोऱ्या बॉण्डवर, चेकवर व कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यामुळे महिला व तिचे कुटुंब त्यांचा जीव वाचवून सोलापूर येथे आले. सोलापूरला आल्यावर देखील फोन द्वारे त्यांना अश्लील शिवीगाळ केली.

 

 

 

 

दिनांक १५/६/२०२४ रोजी गोपी गंजेवार व इतर पाच ते सहा लोक हे जिथे महिला सोलापूर येथे राहत होते तेथे येऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने पोलीस आयुक्त सोलापूर, पोलीस अधीक्षक बीड, एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर यांना तक्रार दिली होती. परंतु वरील आशियाची तक्रार पोलिसांनी घेतली नाही.
त्यावर महिलेने *ॲड. विनोद सूर्यवंशी* यांचेमार्फत जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे एमआयडीसी पोलिसांना गुन्हा नोंद करून तपास करणे करिता अर्ज दाखल केला होता. तो अर्ज माननीय न्यायालयाने महिलेस परत करून सदर अर्ज योग्य त्या न्यायालयाचे स्थळ सीमेत दाखल करण्याचे आदेश पारित केले होते.

 

 

 

 

त्यावर महिलेने सदर आदेशाविरुद्ध *ऍड रितेश थोबडे* यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या सुनावणीपूर्वीच पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकंदर 14 गंभीर गुन्ह्याखाली झिरो नंबरने गुन्हा नोंद केला.

यात आरोपीतर्फे ॲड. रितेश थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button