Epaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

ए आय डेटा सेंटर सारख्या विकास प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार बेअक्कल

सिनारमास कंपनी कोणाच्या बापाची आहे ?

.

 

आमदार देवेंद्र कोठे यांची आमदार रोहित पवारांवर सडकून टीका : आमदार रोहित पवार यांचा सोलापूरकरांनी केला निषेध

सोलापूर : प्रतिनिधी

उजनी जलाशयाशेजारी होणाऱ्या ए आय डेटा सेंटरवरून आमदार रोहित पवार उजनीतील पाण्याचा कळवळा येत असल्याचे नाटक करत आहेत. परंतु भिगवणच्या सिनारमास कंपनीला गेल्या कित्येक वर्षांपासून उजनीचे पाणी दिले जात आहे. ती कंपनी कोणाच्या बापाची आहे ? ए आय डेटा सेंटर सारख्या सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या समृद्धीत भर घालणाऱ्या विकास प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार बेअक्कल आहेत. आणि त्यांचे कार्यकर्ते महाबेअक्कल आहेत, अशी जहरी टीका आमदार देवेंद्र कोठे यांनी शनिवारी आमदार रोहित पवार यांच्यावर केली.

 

 

 

ए आय डेटा सेंटरला विरोध करणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या विरोधात सोलापूरकरांनी शनिवारी रस्त्यावर उतरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जनसमर्थन आंदोलन केले.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. धिक्कार असो धिक्कार असो, रोहित पवारांचा धिक्कार असो, सोलापूरकर तरुणांचा रोजगार हिरावून घेऊ इच्छिणाऱ्या रोहित पवारांचा धिक्कार असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, रोहित पवारांचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दुमदुमून गेला. या आंदोलनास तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

 

 

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, रोहित पवार म्हणजे लबाड लांडगा असून शेतकऱ्यांना पुढे करून सोंग करत आहे. रोहित पवार आणि महाविकास आघाडीकडून राज्यातील मेट्रो, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, नाणार अशा अनेक प्रकल्पांना वारंवार विनाकारण विरोध झाला आहे. सध्या देखील भीमाशंकर पासून १६ किलोमीटर दूर असलेल्या टोरंट प्रकल्पाला खोट्या विमर्शाद्वारे विरोध केला जात आहे. उजनी जलाशयाच्या केवळ ९ टक्के भागावर होणाऱ्या सोलार पॅनल प्रकल्पामुळे पाण्याचे बाष्पीभवन टळून तब्बल दीड टीएमसी पाणी वाचणार आहे. शेजारी शासनाच्याच जमिनीवर ए आय डेटा सेंटर प्रकल्प होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार नाहीत. उर्वरित केवळ १२ एकरावरील भूसंपादनासाठी देखील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे शासनाने मान्य केले आहे. येथील मत्स्यव्यवसाय देखील उर्वरित ९१ टक्के जलाशयावर करता येणार आहे. याशिवाय २ हजार ८०० जणांना कायमस्वरूपी तर ४२ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार या एआय डेटा सेंटरच्या माध्यमातून मिळणार आहे. परंतु सोलापूरचे वाटोळे करण्याचे, विकासाला अडथळा आणण्याचे काम आमदार रोहित पवार करत आहेत.

 

 

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पापेक्षाही मोठा १ लाख २८ हजार कोटी रुपयांचा निधी देऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी उजनी उजनी जलाशयावर ए आय डेटा सेंटर उभारले जाणार आहे. हजारो जणांना रोजगार देणाऱ्या या विकास प्रकल्पाला आमदार रोहित पवार आणि विरोधकांनी विरोध केला तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिला.

यावेळी महापौर विनायक कोंड्याल, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, मनीष देशमुख, नगरसेवक अक्षय अंजिखाने, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन यादव, श्रीदेवी फुलारे आदींनी मनोगत व्यक्त केले.

 

याप्रसंगी यावेळी महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप माने, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते,

 


माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, दिलीप पतंगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मनीष देशमुख, पृथ्वीराज माने, नगरसेवक रुद्रेश बोरामणी, रवी कय्यावाले, भारतसिंग बडूरवाले, किसन जाधव, सत्यनारायण गुर्रम, बिज्जू प्रधाने, ज्ञानेश्वर म्याकल, विजय चिप्पा, आरती वाकसे, सुनिता कामाठी, मंदाकिनी तोडकरी, अक्षय अंजिखाने, नगरसेविका निर्मला जंगम, राजश्री दोडमणी, श्वेता खरात, अर्चना वडनाल, कल्पना कदम, विजया खरात, सतीश सिरसिल्ला, नगरसेवक प्रशांत पल्ली, दीपक जमादार, शंकर चौगुले, अप्पू कडगंची, अजय पोन्नम, मेघनाथ येमुल, महेश बिराजदार, ऋषिकेश मेट्रे, सात्विक बडवे, मृण्मयी गवळी, अश्विनी चव्हाण, सुधा अल्लीमोरे, विकास वाघमारे, सुदर्शन यादव, सारिका खजूरगी, पूजा वाडेकर, श्रीदेवी फुलारे, राजकुमार पाटील, शिवानंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, बजरंग कुलकर्णी, अंबादास बिंगी, नागेश सरगम, अक्षय वाकसे, उत्तरा बरडे आदी उपस्थित होते.
———–

चौकट १

आमदार रोहित पवारांच्या बुद्धीला चढला गंज

आमदार रोहित पवार यांच्या बुद्धीला गंज चढला आहे. त्यामुळे ते स्वतःचे काका दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही मृत्यूवर शंका उपस्थित करून संभ्रम निर्माण करत आहेत. लोकाभिमुख प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा रोहित पवार यांनी विकासाची दृष्टी असलेले दिवंगत नेते अजित पवार यांचा आदर्श घ्यावा, असा सल्लाही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी दिला.
———

चौकट २

रोहित पवार यांच्या अकलेची कीव येते

५० वर्षे घरात सत्ता असून देखील प्राथमिक माहितीही नसलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अकलेची कीव येते. सोलापूर जिल्ह्यासह परिसराचा विकास होत आहे तर तुमच्या पोटात का दुखत आहे ? लवासा प्रकल्पावेळी तुमचे वृक्षप्रेम, निसर्गप्रेम कुठे गेले होते ? असे प्रश्न उपस्थित करून आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button