politicalindia- worldmaharashtrasocialsolapur

सोलापूर तालुका,पोलीस स्टेशनच्या वतीने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन….

सोलापूर 31.10.26

दिनांक 31.10.2026 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने 10 कि.लो.मीटर मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मिनी मॅरेथॉन स्पर्धे करता जास्तीत जास्त मुला-मुलींनी सहभाग घ्यावा. स्पर्धा जिंकणाऱ्या मुला-मुली यांना प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देणार असल्याचे सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि कुंदन गावडे यांनी आवाहन केले होते.

 

 

त्याप्रमाणे आज दिनांक 31.10.2026 रोजी मिनी मॅरेथॉन स्पर्धा
सोलापूर -बार्शी रोड वरील नागनाथ मंदिर ( अकोले काठी कडे जाणारा रोड ) या ठिकाणाहून सुरू होऊन वडाळा या ठिकाणी समाप्त झाली.
सदर मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अकोलेकाठी व वडाळा येथील अकॅडमी मधील मुला मुलींनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम- क्रमांक आदेश चव्हाण द्वितीय क्रमांक पांडुरंग सूर्यवंशी व तृतीय क्रमांक- बाळासो पाटील यांनी पटकाविला. प्रथम क्रमांक 5000/रुपये, द्वितीय क्रमांकास 3000/ व तृतीय क्रमांकास 2000/ व प्रमाणपत्र वाटप केले आहे.
मुलींमध्ये प्रथम क्रमांक – रिया शिंदे (वय-13 वर्ष) द्वितीय क्रमांक – रिया खलाटे (वय-09 वर्ष) व तृतीय क्रमांक वृषाली बनसोडे यांनी पटकावला आहे. मुलींना देखील वर नमूद प्रमाणे बक्षीसची रक्कम व प्रमाणपत्र वाटप केले आहे.
सदर मिनी मॅरेथॉन स्पर्धे करता अकोलीकाटी, वडाळा येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

 

 

 

या मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. कुंदन गावडे यांनी स्वतः सहभाग नोंदविला आहे.
विजेते स्पर्धक यांना पोलीस निरीक्षक .कुंदन गावडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे.
सदरची मिनी मॅरेथॉन स्पर्धा पोलीस अधीक्षक . अतुल कुलकर्णी, मा.अप्पर पोलीस अधीक्षक  विजय कबाडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी  सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि/कुंदन गावडे यांचे नेतृत्वाखाली घेण्यात आली.
सदर मॅरेथॉन स्पर्धे करिता सोलापूर तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button