गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई…

सोलापूर
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ .राजेश देशमुख विभागीय उपायुक्त सागर धोमकर पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार अध्यक्ष भाग्यश्री जाधव , उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३१/१०/२०२६ रोजी मिरज – सोलापूर हायवे रोड, इचगाव टोल नाक्यावर, इचगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य व बियर वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण २३८ बॉक्स यामध्ये ७५० मिली व १८० मिलीच्या मद्याच्या मिळून ३८८८ बाटल्या, बियरच्या २६४ बाटल्या, यामध्ये मद्य २०६८ ब. ली. व बियर १३२ ब. ली १ चारचाकी टाटा कंपनीचे इंट्रा वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकूण १ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तसेच २ जणांवर कारवाई करून ३० लाख ९१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
१ एप्रिल २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मित केंद्रावर अवैध देशी – विदेशी मद्य, परराज्यातील मद्य,बनावट मद्य निर्मिती विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण ६७२८६६ ली.रसायन ४८६९२.५ ली. हातभट्टी दारू ९३३८ .१७ ली.परराज्यातील मद्य बिअर, १०६५८.८ ब. ली. ताडी, रिकाम्या बाटल्या ३३१४९० , बनावट बुचे १३३१६० , बनावट लेबल १५५४०० व स्पिरीट १३८०० ली.असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण १८२५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.तसेच१९२५ जणांवर कारवाई करून १८२ वाहनासह एकूण १० कोटी २२ लाख ९७ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जे. एन.पाटील , दुय्यम निरीक्षक राम निंबाळकर, समाधान शेळके , जवान अनिल पांढरे, चेतन व्हनगुंटी , प्रशांत इंगोले, मंगेश मारसिंग, स्वप्नील यरमाळ , यांनी या कारवाई साठी अथक परिश्रम घेतले.
तसेच अवैध ढाब्यावर मद्य विक्री, अवैध मद्य निर्मिती , वाहतूक ती जवळ बाळगणे यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागा मालक यांनाही सदर कारवाईत आरोपी करण्यात आले आहे.
मिथेनॉल युक्त बनावट दारूमुळे पुणे येथील दुर्घटनेत लोकांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहे. विषारी दारूमुळे किडनी निकामी होणे. कायमस्वरूपी अंधत्व येणे व अकाली मृत्यू असे गंभीर दुष्परिणाम संभवतात . तरी अशा कुठल्याही आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन नागरिकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात येत आहे…



