crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

विवाहितेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी भालगावच्या इसमाची निर्दोष मुक्तता:- ऍड मिलिंद थोबडे…

 

सोलापूर

– विवाहितेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी नागनाथ सुखदेव दराडे, वय 47 रा. भालगाव, तालुका बार्शी जिल्हा सोलापूर याचेवर भरलेल्या खटल्यात बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एल.एस. रोटे यांनी निर्दोष मुक्तता केली.
या हकीकत अशी की, पीडित महिलाही तिच्या पतीसोबत राहत होती. तिच्या पतीस आरोपी हा दारू पिण्यासाठी पैसे देत होता. त्यानंतर ते दोघे घरातच दारू पीत बसत होते. एके दिवशी पीडिता घरात एकटीच असताना आरोपीने तिचे इच्छे विरुद्ध दुष्कर्म केले. त्यानंतर तो तिस फोन करून तिच्या पतीस जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिचे इच्छे विरुद्ध दुष्कर्म करायचा, अशा आशयाची फिर्याद पिडितेने वैराग पोलिस ठाण्यात दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते.

 

 

 

खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपीचे वकील ॲड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात, पोलिसांनी पीडिता व आरोपी यांच्या मोबाईल वरील संभाषणाचे सीडीआर रिपोर्ट नुसार पीडीता व आरोपी हे दिवसातून दोन ते तीन वेळा फोनवर बोलत असल्याचे दिसून येते. तसेच सरकार पक्षाने मेडिकल रिपोर्ट न्यायालयासमोर आणलेला नाही. त्यामुळे आरोपींने दुष्कर्म केले असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी आरोपीची निर्देश मुक्तता केली.

 

 

या आरोपी तर्फे ऍड मिलिंद थोबडे, ऍड निखील पाटील तर सरकारतर्फे ऍड एस. इ. होटकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button