india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्यांना दंडाचा भुर्दंड देऊ नका – संभाजी आरमारची RTO कडे मागणी…

 

शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दंडात्मक कारवाई करु नका अशी मागणी संभाजी आरमारने RTO कडे निवेदनाद्वारे केली आहे. परगाव व परिसरातील अनेक शेतकरी आपल्या शेतातील शेतीमालाची वाहतूक विविध वाहनांद्वारे करीत असतात. सद्यस्थितीत परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने तसेच शेतीचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

 

 

 

 

अशा परिस्थितीत परगाव येथून शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांची वाहने RTO विभागाकडून अडविण्यात येत असून, विविध कारणांवरून दंड आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून संघटनेकडे प्राप्त होत आहेत. शेतीमालाची वाहतूक हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा भाग असून, वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच नैसर्गिक परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

 

 

 

म्हणून परगाव व आसपासच्या परिसरातील शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा. तसेच दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन, नियमांच्या अधीन राहून शेतकऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी आरमार जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, जिल्हा उपप्रमुख प्रमोद जगताप, जिल्हा संघटक अमीत कदम, शहरप्रमुख सागर ढगे, शहर संघटक राज जगताप, संपर्कप्रमुख सोमनाथ मस्के, उपशहरप्रमुख द्वारकेश बबलादीकर, विभागप्रमुख रोहन तपासे आदींनी केली आहे. शिवाजी तात्या वाघमोडे नगरसेवक कार्याध्यक्ष संभाजी आरमार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button