india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

स्थानिक बाजारपेठेत खरेदी करत आमदार देवेंद्र कोठे यांनी दिला ‘व्होकल फॉर लोकल’ चा नारा

स्थानिक दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करण्याचे आवाहन

 

सोलापूर : प्रतिनिधी

दिवाळीनिमित्त स्थानिक बाजारपेठेत खरेदी करत आमदार देवेंद्र कोठे यांनी ‘व्होकल फॉर लोकल’ चा नारा दिला. सोलापूरकरांनीही स्थानिक दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करावी, असे आवाहनही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केले.

स्थानिक बाजारपेठेमध्ये खरेदी केल्यामुळे स्थानिक दुकानदार, व्यापारी, उत्पादक आणि संबंधित वस्तूच्या उत्पादनावर आधारित अनेकांना रोजगार मिळतो. ऑनलाइन खरेदीमुळे काही रक्कम निश्चितपणे वाचते. परंतु स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांचे तसेच वस्तूंची निर्मिती करणारे उत्पादकांचे विक्रीअभावी नुकसान होते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्होकल फॉर लोकल’ चा संदेश देशवासीयांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूरकरांनी स्थानिक व्यापारी उद्योगांना बळ देण्यासाठी स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करावी, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

 

 

यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सहकारी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवारासमवेत स्थानिक बाजारपेठेत खरेदी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे नागरिकांनी कौतुक केले.

——
कोट

व्यापाऱ्यांना आनंद झाल्याचे समाधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार स्थानिक दुकानदारांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन आणि स्वतः खरेदी केल्यामुळे व्यापारी बांधवांनी आनंद व्यक्त केला. लोकप्रतिनिधींनी आवाहन केल्यानंतर समाजात अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा अनुभव दुकानदारांनी सांगितला. स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करण्याच्या आवाहनाचा आनंद व्यापारी वर्गाला झाल्याचे समाधान आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button