सद्दाम खून प्रकरण ! महिला आरोपीचा जामीन फेटाळला:- अँड. संतोष न्हावकर…

सोलापूर
वळसंग येथील दोन गटांत झालेल्या भांडणात सद्दाम अमलीचुंगे याचा खून केल्याप्रकरणी अटकेतील महिला आरोपी फातिमा बुडण नूरवाले रा.वळसंग तालुका अक्कलकोट हिचा जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डी. एन. सुरवसे यांनी फेटाळून लावला.
यात हकिकत आशी की, दि.9/9/2026 रोजी दुपारी 1 वाजता महेबूब मनूरे व सलीम तांबोळी यांच्यात कोणत्यातरी कारणावरून मारामारी झाली होती. सदरचे भांडण झाल्याचे फिर्यादीचा भाऊ सद्दाम अमलीचुंग याला कळल्याने त्याने मध्यस्थी करून मिटवले होते. त्यानंतर गावातील बुडण कटरे,मोहसीन तांबोळी,यासीन कटरे यांनी सद्दाम यास तूच भांडण लावतो आणि तूच मिरवतो. आम्ही तंटामुक्त अध्यक्ष उगीच झालो आहे का? तू हे भांडण मिटवले सोड नाहीतर तुला खल्लास करतो आशी धमकी दिली होती. त्यानंतर फिर्यादी दुपारी 4 वाजता पाणी भरत असताना यासीन कटरे हा त्याच्या इनोव्ह कार व मोहसीन तांबोळी हा त्याच्या स्कॉर्पिओ गाडीतून त्यांच्या मित्रांना घेऊन जोरात हॉर्न वाजवत फिर्यादीच्या जवळ आले आणि आज तुझ्या भावाला सोडणार नाही असे म्हणत गेले व त्यावेळी 4 ते 5 मोटारसायकल वर बुडण नूरवाले, जुबेर फुलारी, महेबूब कटरे, मौला कटरे व इतर लोक मिळून फिर्यादीच्या घराकडे गेले त्यावेळी त्यांच्या हातात लाकडी काठ्या, लोखंडी रॉड, पाईप व कोयते आशी हत्यारे होती त्यांनी घराजवळ जावून फिर्यादीचा भाऊ सद्दाम व तौफिक यांना शिवीगाळ करीत होते त्यामुळे फिर्यादी तेथे जात असता तौफिक अमलीचुंग याला करीम फुलारी याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपन पायावर मारहाण करून त्याचा पाय मोडला व ईतर सर्वजण मिळून दोघांना शिवीगाळ व दमदाटी करीत होते.
त्यावेळी जावेद कटरे याने फिर्यादीस डाव्या हाताला काठीने मारून जखमी केले व सर्वजण सद्दाम याला मारहाण करीत होते त्यावेळी इलाही माशलकर हा त्यांना अडवत असताना जूबेर फुलारी याने त्याच्या हातातील कोयत्याने इलाही याच्या कानावर वार करून जखमी केले. त्यावेळी फिर्यादी व इतर लोक हे आरडाओरडा करीत असताना फातिमा बुडण नूरवाले हिने तिच्यासोबत आणखी 3-4 महिलांना घेऊन काकाच्या घराजवळ आली व तिने फिर्यादी व इतर लोकांना मारहाण करीत घरावर दगडफेक करण्यासाठी सांगितले. त्यामुळे फिर्यादीचे काकाच्या घराचे 25000/- चे नुकसान केले व सदर मारहाणीत फिर्यादीचा भाऊ सद्दाम अमलीचुंग याचा खून केल्याप्रकरणी फिर्यादी
मौला हमिद अमलीचुंगे यांनी
वळसंग पोलीस ठाणे गु.र.नं. 556/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109(1), 118(1), 118(2), 115(2), 189(2), 190, 191(2), 191(3), 351(2), 351(3), 352, 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– फिर्यादीचे भाऊ सद्दाम अमलीचुंगे यांच्या डोक्यात लोखंडी पाईप व रॉडने वार करून जीवे ठार मारले आहे.
– फिर्यादीचे दुसरे भाऊ तौसिफ यांच्या पायावर रॉडने मारहाण करून त्यांचा पाय फ्रॅक्चर केला.
– फिर्यादीस हातावर काठीने मारून जखमी केले.
– ईलाही माशाळकर यांच्या कानावर कोयत्याने वार करून जखमी केले.
– जाफर पिरसाब अमलीचुंगे यांच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांचे सुमारे 25,000 रुपयांचे नुकसान केले.
– जखमी मुस्ताक यालाही दगड मारून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यात अटकेत असलेल्या महिला आरोपी फातिमा बुडण नूरवाले हिने जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जात मूळफिर्यादीतर्फे अँड. संतोष न्हावकर यांनी मूळफिर्यादीचे शपथपत्र दाखल करून जामीन अर्जास तीव्र विरोध केला तर सरकार पक्षातर्फे अँड. आनंद कुर्डूकर यांनी युक्तिवाद करताना आरोपीने संगनमताने खून केला असल्याचे व सदर गुन्ह्यात 4 ते 5 नेत्र साक्षीदार असल्याने त्यांच्या जीविताला या आरोपीकडून धोका निर्माण होऊ शकतो असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
यात मूळ फिर्यादी तर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड. एम एम मनुरे , सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अँड. आनंद कुर्डूकर तर आरोपीतर्फे अँड. रियाज शेख यांनी काम पाहिले.



