crimemaharashtrapoliticalsocialsolapur

२४ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त….

सोलापूर

 

 

जेलरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने चोरीच्या दोन गुन्ह्यांचा अवघ्या २४ तासांत छडा लावून सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलीसांच्या कार्यक्षमतेची चर्चा होत आहे.
जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्केट यार्ड परिसरात २५ फेब्रुवारी रोजी अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीची रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. तसेच ५ मार्च रोजी राहुलकर चौक परिसरातील रहिवासी सुमित्रा वकतेकर सिंघम यांच्या घरातून सुमारे २७ ग्रॅम सोन्याची चेन (किंमत अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये) चोरीस गेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 

 

 

या गुन्ह्यांच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वेगाने हालचाली सुरू केल्या. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी रोहित रविंद्र जाधव (वय २२, व्यवसाय – मजूर, रा. शाहिर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या मित्र मयूर सुरेश जाधव (वय २२, रा. माढ्या निराळे वस्ती, सोलापूर) याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली रिक्षा व सोन्याची चेन असा एकूण सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दुसऱ्या घटनेत अशोक चौक परिसरातील अनिल लक्ष्मण मुळकुंड (वय २२, रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) याला अटक करून त्याच्याकडून सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९६/२०२६ व १५८/२०२६ भादंवि कलम ३०३ अन्वये गुन्हे दाखल असून या प्रकरणांचा अवघ्या २४ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे, सहायक पोलीस आयुक्त प्रताप माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती विराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच पोलीस कर्मचारी शरिफ शेख, गजानन कणशिरे आदींच्या पथकाने केली.
दरम्यान, जेलरोड पोलिसांनी अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa