maharashtrapoliticalsocialsolapur

ईच्छा‎ भगवंताची परिवाराच्या वतीनं‎ सोलापूरच्या विकासाच्या शिलेदारांचा सन्मान

सर्वांना सोबत‎ घेऊन काम करू –‎ महापौर विनायक कोंड्याल

 

जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने‎ लक्ष केंद्रित करू-उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर 

सोलापूर

 

ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या वतीने‎ भाजपा नगरसेवक किसन‎ जाधव यांच्या सात‎ रस्ता‎ परिसरातील‎ सोनामाता प्रशाला‎ समोरील संपर्क‎ कार्यालयात‎ नूतन स्वीकृत नगरसेवक तसेच स्थायी‎ समिती‎ सदस्यांचा‎ भव्य सत्कार सोहळा‎ उत्साहात पार‎ पडला. शाल,‎ भगवा फेटा,‎ वृक्ष आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन‎ चरित्रावरील‎ पुस्तक भेट‎ देऊन‎ मान्यवरांचा‎ गौरव‎ करण्यात आला या कार्यक्रमास‎ महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी‎ देवकर‎ यांच्यासह‎ माजी‎ महिला व बालकल्याण‎ समिती सभापती, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव,‎ स्वीकृत नगरसेविका वृषाली‎ चालुक्य,‎ देवकर‎ मावशी,‎ बिजू‎ प्रधाने, सत्यनारायण गुर्रम, विजय‎ चिप्पा,‎ शिवाजी वाघमोडे, सतीश शिरसिल्ला, भरतसिंग बडूरवाले, अक्षय अंजिखाने,‎ श्रीनिवास‎ दायमा, ज्ञानेश्वर‎ म्याकल,‎ अँड.‎ ऋषिकेश‎ मेट्रे,‎ रुद्रेश‎ बोरामणी,‎ विठ्ठल‎ मेट्रे‎ आदी‎ उपस्थित होते. यावेळी किसन जाधव,‎ नगरसेवक दत्तात्रय नडगिरी, माजी‎ परिवहन समिती सदस्य‎ संतोष‎ कदम, युवा‎ नेते‎ चेतन नागेश‎  गायकवाड,‎ महेश‎ देवकर, वृक्षमित्र मनोज देवकर,‎ निलेश‎ कांबळे,‎ अरविंद‎ शेरखाने,‎ संतोष‎ गायकवाड (हुडको), अमोल जगताप, रामभाऊ मिस्त्री, किरण‎ शिंदे,‎ हुलगप्पा शासम,‎ उत्कर्ष‎ गायकवाड, यल्लाप्पा शिवापुरी,‎ प्रथमेश‎ पवार, ऋषी येवले, बिराजदार मावशी, शोभा‎ गायकवाड,‎ मारता असादे,‎ प्रमिला स्वामी, शहाजान शेख,‎ फिरोज‎ पठाण‎ आदींची‎ उपस्थिती‎ लक्षणीय‎ ठरली.

 

 

 

 

 

सत्कारास‎ उत्तर‎ देताना महापौर‎ विनायक कोंड्याल यांनी‎ सोलापूर‎ शहराच्या‎ सर्वांगीण‎ विकासासाठी सर्व‎ घटकांना‎ सोबत घेऊन‎ पारदर्शक व‎ विकासाभिमुख काम करू, अशी ग्वाही‎ दिली.‎ शहरातील मूलभूत‎ सुविधा,‎ स्वच्छता,‎ पायाभूत‎ विकास आणि जनसामान्यांच्या‎ प्रश्नांवर‎ प्राधान्याने‎ लक्ष‎ केंद्रित केले जाईल.

 

 

असे‎ मनोगत‎ उपमहापौर‎ ज्ञानेश्वरी‎ देवकर यांनी व्यक्त‎ केले‎ यावेळी उपस्थित नूतन सदस्यांना किसन‎ जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.‎ या‎ कार्यक्रमामुळे‎ सोलापूरच्या‎ विकासाच्या‎ शिलेदारांना एकत्र‎ आणण्याचा‎ संदेश देत शहरात सकारात्मक राजकीय‎ वातावरण निर्माण‎ झाल्याचे चित्र‎ दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button