crimemaharashtrasocialsolapur

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर- ऍड नागनाथ बिराजदार…

सोलापूर

घरासमोरील शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळताना तक्रारदाराच्या मुलीस जाणून-बुजून बाॅलने मारले, अश्लील शिवीगाळ केली. नंतर दुसऱ्या दिवशी भावासोबत (आरोपी नंबर १) तक्रारदाराच्या घरी येऊन तक्रारदारास अश्लील शिवीगाळ करून कपडे फाडले व मुलीला फरफटत बाहेर आणून अश्लील शिवीगाळ केली व त्याद्वारे तक्रारदाराचा व तक्रारदाराच्या दोन मुलींचा विनयभंग केला. त्यानंतर तक्रारदाराच्या पतीस मारहाण करून, अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराची फिर्याद अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी व त्याचा भाऊ याच्या विरुद्ध दाखल झाली होती. सदरच्या गुन्ह्यात आरोपी प्रदीप पाटील यास अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश एस व्ही केंद्रे साहेब यांनी मंजूर केला.
यात ऍड. नागनाथ बिराजदार यांनी आरोपी प्रदीप पाटील याच्यातर्फे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपीस खोटेपणाने गुंतवण्यात आलेले आहे, आरोपी केवळ भावासोबत घटनास्थळी आला होता, इतकाच आरोप त्याच्याविरुद्ध फिर्यादीत केला गेला आहे, हे निदर्शनास आणून दिले. त्याने प्रत्यक्षात कोणतेही कृत्य केले नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात आरोपी तर्फे ऍड नागनाथ बिराजदार यांनी काम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa