maharashtrapoliticalsocialsolapur

प्रभाग २२‎ साठी आरोग्याचा‎ नवा श्वास! सोनी नगर‎ येथे‎ नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू;‎ हजारो नागरिकांना दिलासा

 

 

सोलापूर

 

सोलापूर महानगरपालिका प्रभाग‎ क्रमांक‎ २२ मधील नागरिकांसाठी आरोग्याच्या‎ दृष्टीने‎ मोठी आणि‎ दिलासादायक‎ ठरला आहे.‎ सोनी‎ नगर येथे नूतन ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’ उभारण्यात‎ आले‎ असून परिसरातील‎ हजारो नागरिकांना याचा थेट‎ लाभ होणार आहे.‎ या केंद्रासाठी प्रभागातील‎ भाजपा नगरसेवक किसन‎ जाधव,‎ दत्तात्रय‎ नडगिरी,‎ सौ. अंबिका नागेश‎ अण्णा‎ गायकवाड व‎ सौ.‎ चैत्रालीताई‎ शिवराज‎ गायकवाड यांनी‎ जिल्ह्याचे पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे‎ आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा‎ मतदारसंघाचे‎ आमदार‎ देवेंद्र‎ कोठे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा‎ केला‎ होता.‎

 

 

 

त्यांच्या सकारात्मक‎ भूमिकेमुळे आणि‎ प्रशासनाच्या सहकार्याने‎ हे केंद्र‎ साकार‎ झाले. सोलापूर‎ महानगरपालिकेचे‎ आयुक्त‎ डॉ.‎ सचिन ओंबासे, उपायुक्त‎ लोकरे‎ साहेब‎ व‎ आरोग्य अधिकारी‎ राखी माने यांच्या‎ मार्गदर्शनाखाली‎ केंद्राची‎ उभारणी पूर्ण झाली. या‎ केंद्रामुळे‎ सोनी नगर‎ हडको,‎ लहान इरण्णा‎ वस्ती,‎ मोठी‎ इरण्णा‎ वस्ती,‎ रेवणसिद्धेश्वर नगर झोपडपट्टी,‎ आम्रपाली चौक परिसरातील‎ नागरिकांना‎ आर्थिक‎ आणि‎ आरोग्यदृष्ट्या मोठा फायदा‎ होणार आहे. उद्घाटनानिमित्त आयोजित आरोग्य‎ शिबिरात तज्ञ‎ डॉक्टरांकडून‎ नागरिकांची‎ तपासणी करून‎ मोफत औषधोपचार‎ देण्यात आले. अत्याधुनिक‎ सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेले‎ हे‎ केंद्र‎ कष्टकरी‎ कामगारांसाठी वरदान ठरणार‎ असल्याचे‎ नगरसेवक किसन‎ जाधव यांनी सांगितले.

 

 

 

तसेच‎ या‎ उपक्रमासाठी‎ पालकमंत्री गोरे‎ आणि‎ आमदार‎ कोठे यांचे त्यांनी‎ विशेष‎ आभार‎ मानले. प्रभाग २२‎ मध्ये आरोग्यसेवेचा हा‎ नवा अध्याय ठरून नागरिकांच्या‎ जीवनमानात सकारात्मक बदल‎ घडवेल, असा‎ विश्वास‎ व्यक्त‎ केला‎ जात‎ आहे.

 

 

 

‎ या‎ आरोग्य शिबिराप्रसंगी डॉ. म्हेत्रे, प्राजक्ता काकडे,‎ रुपेश गायकवाड, संतोष माने, इस्माईल‎ मनुरे,‎ मल्लिकार्जुन बेनावत, अविनाश‎ गवळी, उमेश‎ चलवादी,प्रीती गायकवाड‎ आदी आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्यासह नागेश ढेंगळे, संतोष‎ गायकवाड,‎ हरीश तेलगू, विकी‎ सगटे,‎ सिद्राम‎ माडेकर,‎ येलगुंडे‎ मावशी, वसंत‎ पवार आदींची उपस्थिती‎ होती.‎ या‎ आरोग्य‎ शिबिरास‎ परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त‎ प्रतिसाद‎ दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button