बापू , भाईजी,गायकवाड ,सत्तूबर ,पाटील , चौंडे निवडणुकीच्या रिंगणात….
भाजपची कुरघोडीमुळे शिवसेनेचे वाघ निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेच्या रणनितीमुळे भाजपाला बसणार मोठा फटाका
सोलापूर
शिवसेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी मागील २५ वर्षापासून मध्यची जागा शिवसेनेची असून भा. ज. पा. ही जागा खोटेबोलून बळकवण्याचा प्रयत्न करत आहे, असे झाल्यास सोलापूर शहर जिल्ह्यातील भाजपाचे सर्व उमेदवार पाडू असा इशारा शिवसेना शहर-जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली, सोलापूर शहर मध्ये विधानसभा मध्ये शिवसेनेचे मोठे प्राबल्य असून या ठिकाणी शिवसेनेचे आमदार ही निवडून आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेला हा मतदारसंघ सोडावा, भाजपाने सोलापूर जिल्ह्यातील इतर मतदारसंघात आपले आमदार असताना शहर मध्य कशाला हवा आहे, शहर मध्ये भाजपाकडे उमेदवार नसताना देखील त्याने उमेदवार आयात करून शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय, हे कदापि शिवसेना सहन करणार नाही, अन्नदास भाजपाचे शहर जिल्ह्यातील सर्व उमेदवार पाडू, शहर मध्य मधून शिवसेना शहरप्रमुख मनोज भाईजी शेजवाल, शहर उत्तर मधून जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, शहर दक्षिण उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सत्तूबर व युवा सेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड, अक्कलकोट मधून अभिजीत आप्पासाहेब पाटील तर पंढरपूर मंगळवेढा मधून तालुकाप्रमुख अशोक चौंडे हे संभाव्य उमेदवार असतील व उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यात येईल असे जाहीर करण्यात आले,
याप्रसंगी जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे शहरप्रमुख मनोज भाईजी शेजवाल, उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सतूबार,तुकाराम मस्के युवासेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड, सागर शितोळे राजकुमार शिंदे, नवनाथ चव्हाण, युवा सेना शहरप्रमुख समर्थ मोठे, संजय सरवदे, सुनील निंबाळकर, हरिभाऊ चौगुले, बापू ढगे,शंकर चौगुले, जावेद पटेल, अक्षय बिद्री, ब्रह्मदेव गायकवाड, प्रकाश शिंदे, सायबन्ना तेगगेली, राजेंद्र कांबळे, गफूर शेख, प्रकाश शिंदे, किशोर चव्हाण, सूर्योदन सुतार, शिवराज विभुते, अल्फरान आबादीराजे, शरद काटे, दिनेश जगताप, महेश खुर्द, आशिष परदेशी, शशी शिंदे, महादेव सावंत, संतोष शेळीकर, संजय दुबे, संजय होळकर, महेश गायकवाड, जयश्रीताई पवार, सुनंदाताई साळुंखे, मनिषा ताई नलावडे, अनिताताई गवळी, पूजाताई चव्हाण, कस्पटे ताई, मारताताई असादे, पूजाताई कांबळे, अंजनाताई चव्हाण, संगीताताई खांबसकर, आकाश गजघाटे, अनिकेत लोंढे, उमाकांत करंडे, मुकेश ठाकूर, बाळासाहेब बिडकर, यांच्यासह आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.