दि. 25/08/2023 रोजी करमाळा येथे घडलेल्या उमा पवार हिच्या खुन प्रकरणात अटक असलेला तिचा पती प्रफुल्ल विठ्ठल पवार रा. करमाळा याने दाखल केलेल्या जामिन अर्जाची सुनावणी बार्शी सत्र न्यायालयाचे न्यायाधिश श्री. विक्रमादीत्य मांडे यांच्यासमोर होऊन
न्यायाधिशांनी आरोपी पतीचा जामीन अर्ज नामंजुर केला.
आरोपी व्यसनाधिन असल्यामुळे उमा हिचा भाऊ फिर्यादी दादासाहेब चव्हाण रा. मोहोळ याने बहिणीची मुले हुशार असल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणुन बहिणीचा मुलगा
महेश यास मोहोळ येथे शिक्षणासाठी आणले होते. त्याचा राग मनात धरुन पती
प्रफुल्ल पवार याने पत्नी उर्मिला यांच्यावर वजनदार दगडी वरवंटा डोक्यात मारुन खुन केला होता व हे प्रकरण आत्महत्या असल्याचा बनाव करुन मृत प्रेताला गळफास दिला, या आरोपावरुन करमाळा पोलिसांनी
आरोपीस अटक करुन न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले आहे.
आरोपीने न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जास मुळ फिर्यादी दादासाहेब चव्हाण याने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करुन प्रखर विरोध केला होता. सरकारी वकील श्री दिनेश देशमुख यांनी आपल्या युक्तिवादात वैद्यकीय पुराव्यावरुन उमा हिचा मृत्यु आत्महत्येमुळे झाला नसुन खुनामुळे झाला आहे. आरोपीने पत्नीचा निर्घृणपणे खून केल्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद केला.न्यायाधिशांनी आरोपीचा जामिन अर्ज फेटाळून लावला.
या प्रकरणात सरकारतर्फे ॲड. दिनेश देशमुख, मुळ फिर्यादी मयताच्या भावातर्फे ॲड. जयदीप माने ,ॲड. शरद झालटे, ॲड. रियाज शेख (मोहोळ) तर आरोपीतर्फे ॲड. एन. टी. पाटील यांनी काम पाहिले.