विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली भेट शिंदे व मोहोळ यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण…
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून विमानसेवेसाठी पाठपुरावा ...
•नवी दिल्ली:- सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू करण्यासाठी आणि होटगी रोडवरील विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. या दोन्ही विमानतळाचे प्रलंबित प्रश्न घेऊन खासदार शिंदे यांनी बुधवारी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी विमानतळाचे काम सुरु करण्यासाठी निवेदन दिले आहे.
विमानतळाच्या प्रश्नासंदर्भात मोहोळ यांची भेट घेऊन दिलेल्या घेतलेल्या निवेदनात प्रणिती शिंदे यांनी म्हंटले आहे की, सोलापूरमध्ये बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि होटेगी रोड अशी दोन विमानतळ आहेत. सध्या होटगी रोड येथील विमानतळा वरून विमान उड्डाण सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे या विमानतळवरून तत्काळ विमान सेवा सुरु करायला हवी. अशी विनंती त्यांनी मंत्र्यांना केली आहे.
या शिवाय सोलापूर मधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अधिक वेगाने करायला पाहिजे. यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे नियोजन होणे आवश्यक आहे. यासंदर्भात आपणाकडून सकारात्मक कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.