सोलापूर –
शिक्षणमहर्षी, स्वर्गीय विष्णूपंत तात्यासाहेब कोठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार दि. २० डिसेंबर २०२४ रोजी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी जाहीर केले.
स्व. विष्णूपंत कोठे यांनी अनेक समाजसेवकांना, राजकीय कार्यकर्त्यांना घडवले, सर्वसामान्यांसाठी शिक्षण संस्था उभारल्या, अनेक मंदिरे-देवस्थानाचे त्यांना आधारस्तंभ मानले जायचे. त्यामुळे त्यांच्या ८७ व्या जयंतीचे औचित्य साधून समजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या हेतूने स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीप्रसंगी देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या वाढदिवसाला जाहीर केलेल्या संकल्पाप्रमाणे या वर्षात प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात यावा असे ठरले. २० डिसेंबर २०२४ रोजी हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी देवेंद्र कोठे यांच्या नवी वेस पोलिस चौकी समोर असलेल्या संपर्क कार्यालयात नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या समवेत गुरुशांत धुत्तरगांवकर, सत्यनारायण गुर्रम, रमेश यन्नम, सुरज चौहान, सिद्धेश्वर टेंगळे-स्वामी, सिद्धेश्वर कमटम, पवन खांडेकर, अमोल कोंड्याल व प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.