“प्रत्येक शाळेस स्व. अजितदादा पवारांची प्रतिमा भेट ; राष्ट्रवादीचा उपक्रम…

सोलापूर
स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतराव पवार यांच्या शासकीय जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये जयंती साजरी करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शहरातील शाळा व महाविद्यालयांना स्व. अजितदादा पवार यांच्या अधिकृत प्रतिमा भेट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, २२ जुलै रोजी स्व. अजितदादा पवार यांची शासकीय जयंती साजरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिमा संबंधित शैक्षणिक संस्थांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यासाठी ज्या शाळा, महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्थांना स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा आवश्यक आहे, त्यांनी सोमवार, दि. २० जुलै रोजी सायंकाळी ९ वाजेपर्यंत सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले (मो. ९८५०११००५०) किंवा शामराव गांगर्डे (मो. ९७६४३५५०५०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेळेत संपर्क साधणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आली आहे…



