india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मनपाच्या इतिहासातील विक्रमी ठरावाबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी केला महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार

 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासातील विक्रमी १८० हून अधिक ठराव एकच सर्वसाधारण सभेत मंजूर केल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांचा सोमवारी सत्कार केला.

 

 

 

सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. या सभेच्या अजेंड्यावर विक्रमी १८० हून अधिक विषय होते. महापौर विनायक कोंड्याल यांनी या सर्व विषयांना मंजुरी देत सर्वसाधारण सभा गाजवली.

 

 

 

सभागृहातील प्रत्येकाला बोलण्याची संधी देत अनावश्यक वेळ न दवडता महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व विषयांना मंजुरी देत, नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे देत सर्व सदस्यांचे समाधान केले. महापौर विनायक कोंड्याल यांच्या या कार्यशैलीचे सर्वांनीच कौतुक केले. सोमवारी सायंकाळी सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी विनायक कोंड्याल यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कौतुक केले. यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक विनोद भोसले, प्रशांत पल्ली, सिद्धेश्वर कमटम, विजय चिप्पा, अक्षय अंजिखाने, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, दीपक राजगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button