india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूरकरांना वाढदिवसाचे 'रिटर्न गिफ्ट' : आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश

 

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या आयटी पार्कसाठी होटगी येथील पाटबंधारे विभागाची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला विनामोबदला देण्याचे आदेश बुधवारी निघाले. या आदेशामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

 

 

सोलापूरकरिता होटगी येथे आयटी पार्क करण्याचा निर्णय झाल्यानंतर या आयटी पार्कला जागा मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. मुंबई येथे झालेल्या बैठकांमध्येही आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरच्या आयटी पार्कचा विषय उचलून धरला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच सोलापूरच्या आयटी पार्कसाठी जलसंपदा खात्याची जमीन विना मोबदला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याचा शब्द अधिवेशन काळात झालेल्या भेटीप्रसंगी दिला होता.

 

 

 

बुधवारी पाटबंधारे विभागाने आदेश काढून होटगी येथील लघु पाटबंधारे तलावाची गट नंबर ५७६ मधील २० हेक्‍टर जागा आयटी पार्कसाठी विना मोबदला हस्तांतरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतचे पत्र लघुपाटबंधारे विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहे.

 

 

 

होटगी येथील जागा हस्तांतरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडला होता. त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा केला होता. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असल्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्यात येण्यापूर्वी याबाबतचे त्वरित आदेश काढण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी संबंधितांना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी सायंकाळी याबाबतचा आदेश निघाला. बुधवारी झालेल्या या निर्णयामुळे सोलापुरातील आयटी पार्क होटगी येथेच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

 

———-

कोट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूरकरांना वाढदिवसाचे ‘रिटर्न गिफ्टच’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरच्या विकासाची तळमळ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. हा आदेश म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरकरांना दिलेले रिटर्न गिफ्टच आहे. सोलापूरकरांचे आयटी पार्कचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. सोलापुरातील उच्चशिक्षित तरुणांना सोलापुरातच काम मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजपाने दिलेला आणखी एक शब्द आम्ही लवकरच पूर्ण करत आहोत.
देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button