लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिसास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर:-

सोलापूर
१,२०,०००/- रुपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस हे. कॉ. राजशेखर रामचंद्र कोळी वय- ४२ रा- सत्तरफूट रोड, अशोक चौक, सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६६/२०२६ हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हे.कॉ. राजशेखर रामचंद्र कोळी हे करत होते, पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहन व मोबाईल ताब्यात घेतले होते व इतर दोन आरोपींना अटक न करण्यास व वाहन व मोबाईल सोडवण्यासाठी १,२०,०००/- रुपये लाचेची मागणी केली अशा आशयाची तक्रार समर्थ महादेव अनगले यांनी लाचलुचपत कार्यालयात दिली होती. त्यावरून लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचून सदर लाचेची रक्कम खाजगी इसम आकाश आडराम याने स्वीकारली. अशा आशयाची फिर्याद पोलीस निरीक्षक रवींद्र लांबाते यांनी दिली होती.
आपणासाठी होऊ नये म्हणून पोलीस हे. कॉ. कोळी यांनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर पोलिस हे. कॉ. कोळी याने ॲड रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन मिळणे करिता अटकपूर्व जामीन दाखल केला होता.
जामीन अर्जाच्या सुनावणीच्यावेळी ॲड.रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात लाचलुचपत अधिकारी यांनी केलेल्या पडताळणी मध्ये आरोपी कोळी याने लाचेची स्पष्ट अशी मागणी केली नसल्याचे दिसून येत असल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी 50,000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात अर्जदार पोलिसातर्फे ॲड. रितेश थोबडे, ॲड. अभिजीत इटकर यांनी तर सरकारतर्फे ॲड.एस. एन. देशमुख यांनी काम पाहिले.



