india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद  चंदनशिवे यांच्या वतीने विविध कार्यक्रम…

 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर :

 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे यांच्या वतीने बुधवार दिनांक22/7/2026 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

1) प्रबुद्ध भारत चौक,मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस भारत बाबरे,गोपीनाथ जाधव व प्रमोद शिंदे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत जनतेची सेवा करीत होते. आज स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती शासकीय स्तरातून साजरा करण्याचे निर्णय सरकार घेतलेला आहे. सर्वात जास्त उपमुख्यमंत्री राहण्याचे मान स्वर्गीय अजितदादा पवार यांना मिळालेला आहे. ते बारामती मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आलेले आहेत. स्वर्गीय अजितदादा पवार हे लोकनेते आहेत. जनतेची सेवा करणे आपले धर्म आहे असे स्वर्गीय अजितदादा पवार प्रत्येक वेळी म्हणायचे.
यावेळी पी. वी. ग्रुपचे प्रमुख गौतम (महाराज) चंदनशिवे,
पी. बी.ग्रुप अध्यक्ष प्रवीण( गुडू) शिंदे, सर्पमित्र अनिल आलदर, मनोज (मॅडी) थोरात, नाना कापुरे, अनिस सय्यद, आशिष पात्रे, सुखदेव इंगळे,गौतम शिंदे,रंगा वाघमारे, रवी सकट, अमित माने, संजय इंगळे, सिद्धार्थ गोतसुर्वे, सुबोध वाळवे, अभिजीत कापुरे, निखिल कदम, शिरीष गायकवाड, सागर देडे , उत्तम वाघमारे, आकाश कुचेकर, संतोष वाघमारे आकाश कुचेकर, अजय अंकुश,बंटी माने, रोहित गायकवाड, भीमा मस्के, जयराज सांगे इत्यादी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

2) महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 27 येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे यांच्या वतीने मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे व म.न.पा. मुलांची मराठी शाळा क्र.27 हे मुख्याध्यापिका नवले मॅडम यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

यानंतर म.न.पा.मुलांची मराठी शाळा क्रमांक 27 मधील उपस्थित हजारो विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे यांच्यावतीने खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत (चाचा) सोनवणे, गोपीनाथ जाधव,संजय इंगळे, शितल पवार मॅडम, रेखा मगर मॅडम,सिद्धवाडकर मॅडम,मंदाकिनी जाधव मावशी, व शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

3) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद( दादा) चंदनशिवे यांच्या वतीने जुना कारंबा नाका स्मशानभूमी, सोलापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी प्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद( दादा) चंदनशिवे व उपस्थित महिलांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

 


यानंतर जुना कारंबा नाका स्मशानभूमी येथे विविध वृक्षाचे वृक्षारोपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे व उपस्थित महिलांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी गौतम( महाराज) चंदनशिवे, जनार्दन थोरात, गोपीनाथ जाधव, मनोज (मॅडी )थोरात, सिद्धार्थ गोतसुर्वे, आशिष पात्रे, अनिस सय्यद, रंगा वाघमारे, संजय इंगळे, आकाश कुचेकर,रवी सकट, सागर देडे, कैलास वाघमारे, गौतम शिंदे, राहुल बागले,
रवींद्र बनसोडे, राकेश बागले, सखुबाई शितोळे, सुवर्णा तूपसुंदर, सुशीला कांबळे, ज्योती कदम,रेखा बागले , बायडाबाई बनसोडे, जोशना बागले,रोहिणी बागले इत्यादी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button