जीर्णोद्धारिनी प्रतिष्ठानतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी; सोलापूर शहरात ३०१ वृक्ष लावण्याचा आणि संवर्धनाचा संकल्प

सोलापूर
जीर्णोद्धारिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती सोलापूर शहरात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. जीर्णोद्धारिनी प्रतिष्ठान च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून झाली. जयंतीच्या निमित्ताने नागरिकांना व कार्यकर्त्यांना लाडू प्रसादाचे वाटप करून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले.
३०१ वृक्षांचे रोपण आणि संवर्धनाचा अनोखा संकल्प
प्रतिष्ठानचे हे प्रथम वर्ष असून, जयंतीचे औचित्य साधून एक सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सोलापूर शहरात तसेच प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या, नातेवाईकांच्या आणि मित्रपरिवाराच्या घरासमोर एकूण ३०१ वृक्ष लावण्यात येणार आहेत. केवळ वृक्षारोपण करून न थांबता, या लावलेल्या झाडांचे वर्षभर जबाबदारीने संवर्धन करून दाखवणार, असा ठाम मानस प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

”संस्कार, संशोधन आणि समाजसेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेले जीर्णोद्धारिणी प्रतिष्ठान हे कार्य वर्षभर अखंडपणे चालू ठेवणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला सोलापूर शहरातील राजकीय, सामाजिक आणि विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अमोल शिंदे (शिवसेना जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक)
सतीश वावरे (संस्थापक अध्यक्ष, जीर्णोद्धारिनी प्रतिष्ठान)
शिरीष जगदाळे (मार्गदर्शक तथा संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष)
लखन गावडे (मध्यवर्ती महामंडळ)बिराप्पा बंडगर( मध्यवर्ती महामंडळ )मनिषा माने (महामंडळ अध्यक्ष)किरण माशाळकर (कार्याध्यक्ष)यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे प्रकाश ननवरे, दिलीप भोसले, दिलीप निंबाळकर, लिंगराज जाधव, खामितकर साहेब, विक्रांत वनकर, ऋषिकेश कोकरे, सिद्धराम सावळे, शेखर कंटीकर, शेखर भोसले, प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मल्हारी भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीर्णोद्धारिणी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व उपस्थितांनी प्रतिष्ठानच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.



