राज्य उत्पादन शुल्क, विभाग सोलापूर यांची जिल्ह्यात गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य वाहतुकीवर धडक कारवाई …

सोलापूर
राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांची मा.डॉ. राजेश देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा. श्री सागर धोमकर साहेब, विभागीय उपायुक्त, पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार मा. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर व श्री सौरभ वा. अदाटे, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली दि.१२/०७/२०२६ रोजी मौजे. मळोली या गावच्या हद्दीत सांगोला ते इंदापूर रोडवर, साळमुख चौक, मळोली ता. माळशिरस जि. सोलापूर या ठिकाणी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य वाहतूकीवर केलेल्या थडक कारवाईत एकुण ७०० बॉक्स यामध्ये ७५० मिलीच्या विदेशी मद्याच्या ८४०० बाटल्या एकुण ६३०० ब.लि. गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य, १ चोदा चाकी अशोक लेलँन्ड कंपनीचा ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एकुण १ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच २ जनांवर कारवाई करुन रु.१,२४,७१,०००/- किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
तसेच मागिल आठवडयामध्ये दिनांक ०८/०७/२०२६ रोजी मौजे. सादेपूर ता.दक्षिण सोलापूर जि. सोलापूर या ठिकाणी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य ७५० मिलीच्या ३६ बाटल्या, बनावट विदेशी मद्य १८० मिलीच्या २८ बाटल्या, ५०० बुचे, १५० रिकाम्या बाटल्या, १ दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एकुण १ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच १ आरोपी फरार असुन २ जनांवर कारवाई करुन रु.१,२६,४८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच दिनांक ०८/०७/२०२६ रोजी हत्तुर-कुमठे रोड, हत्तुर ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर या ठिकाणी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य ७५० मिलीच्या १५६ बाटल्या, बनावट विदेशी मद्य १८० मिलीच्या १० बाटल्या, ६०० बुचे, १२७५ रिकाम्या बाटल्या, २ दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एकुण १ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच ४ जनांवर कारवाई करुन रु.३,६२,६९०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिनांक ११/०७/२०२६ रोजी मौजे. निजामपूर गावचे हद्दीत ता. सांगोला जि.सोलापूर या ठिकाणी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य ७५० मिलीच्या १५ बाटल्या, व १८० मिलीच्या १८३ बाटल्या, ७८० बुचे, ३७४० रिकाम्या बाटल्या, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एकुण १ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच ३ आरोपी फरार असुन रु.१,०४,७००/- किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
माहे १ एप्रिल २०२६ ते दि.१२ जुलै २०२६ या कालावधीत या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य / परराज्यातील मद्य /बनावट मद्य निर्मिती विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण ३३३०४० ली. रसायन, २५७४०.५ लि. हातभट्टी दारु, ६९१२.२७ ब.लि. परराज्यातील मद्य, १३०७.४४ ब.लि. देशी मद्य, ४५४.१५ ब.लि. विदेशी मद्य, ४७९.१७ ब.ली. बिअर, ताडी ३७५७ ब.लि. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण ८७३ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच एकूण ८९८ जणांवर कारवाई करुन ८३ वाहनासह एकूण रुपये ४,१४,२५,३९१/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे निरीक्षक श्री.एस.जी. भवड व श्री.आर.के.पवार, श्री.ए.व्ही. घाटगे, दुय्यम निरीक्षक श्री.एस.एस. भोसले, श्री.एस.बी. शेळके, श्री.एस.एस.शिंदे, श्री.ए. आर. नांगरे, सहायक दुय्यम निरीक्षक श्री.एस.ए. बिराजदार, जवान श्री.पी.डी.पुसावळे, श्री.डी.ए.चौधरी, श्री.आर.पी. कांबळे, श्री.वाय.बी. तोग्गी, श्री.व्ही.ए. काळे, श्री.टि.एच. जाधव, श्री.वाय.ए.पाटील, महिला जवान श्रीमती के.ए. जाधव तसेच जवान-नि-वाहनचालक श्री.एम.एस. जडगे व अकार्यकारी घटकावरील अधिकारी / कर्मचारी यांनी पार पाडली आहे.
तसेच अवैध ढाब्यावर मद्य विक्री, अवैध मद्य निर्मिती, वाहतुक, ती जवळ बाळगणे यासाठी वापरण्यात येणा-या जागा मालक यांनाही सदर कारवाईत आरोपी करण्यात येते याची नोंद घ्यावी. मिथेनॉलयुक्त बनावट दारुमुळे पुणे येथील दुर्घटनेत लोकांचे दुदेर्वी मृत्यु झाले आहे. तरी सदर प्रकारच्या विषारी दारु मुळे किडनी निकामी होणे, कामस्वरुपीचा अंधत्व येणे व अकाली मृत्यु असे गंभीर दुष्परिणाम संभवतात, तरी अश्या कुठल्याही अमिषांना बळी न पडण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात येत आहे.
“आपल्या परिसरात कोठेही अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास अथवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट इत्यादी तत्सम पदार्थ, द्रव्याची निर्मिती, भेसळ, वाहतुक, विक्री होत असल्यास त्याची माहिती टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या क्रमांकावर तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.



